कीव्ह : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आता नवा अंक पाहायला मिळत आहे. कारण रशियानं युक्रेनवर लांब पल्ल्याचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागलं आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील सरकारच्या मुख्यालयातून याची माहिती देण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्व युक्रेननं रशियावर अमिरेकनं आणि ब्रिटिश बनावटीची क्षेपणासत्र रशियावर डागली होती. युक्रेनच्या हवाई दलानं गुरुवारी ही माहिती दिली.