International Coffee Day 2023 : बहुतांश लोकांची सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. एवढेच नाही तर जेव्हा क्रेविंग होईल तेव्हा लोक कॉफी पितात. दरवर्षी १ ऑक्टोबरला वर्ल्ड कॉफी डे साजरा केला जातो. यानिमित्ताने जगातील सगळ्यात महागड्या कॉफी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
ही जगातील सगळ्यात महागड्या कॉफीपैकी एक आहे. ही कॉफी इंडोनेशियामध्ये बनवली जाते. या कॉफीची खासियत म्हणजे यात इतर कॉफीप्रमाणे कडूपणा नसतो. ही कॉफी बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. कॉफीच्या बिया सिवेट कॅटला खाऊ घालतात. नंतर तिच्या विष्ठेतून कॉफीचे दाणे निवडले जातात. या कारणाने या कॉफीला 'पूप कॉफी' असेही म्हटले जाते. प्राण्यांच्या विष्ठेतून बाहेर पडल्या कारणाने कॉफीचा कडूपणा आणि अॅसिडीटी नष्ट होते. या कॉफीची किंमत जवळपास ६०० डॉलर आहे.
पश्चिम पनामाच्या पर्वतीय क्षेत्रात उगवणारी ही कॉफी जगभरातील महागड्या कॉफीपैकी एक आहे. कॉफीच्या बिया निवडून त्यात थंड हवेत पिकण्यासाठी ठेवल्या जातात. या कॉफी उगवण्यासाठी फार मेहनत लागते. या कॉफीची किंमत ३५० डॉलर एवढी आहे.
थायलंडमध्ये उगवणाऱ्या या कॉफीला बनवण्याची पद्धत फार वेगळी आहे. ही कॉफी बनवण्यासाठी अरेबिका चेर्रीज हत्तीला खाऊ घालतात. त्यानंतर त्यांच्या विष्ठेतून बिया निवडल्या जातात आणि त्यानंतर प्रोसेस करून कॉफी बनवली जाते. या कॉफीची किंमत जवळपास १५०० डॉलर असते. या कॉफीला बनवण्यासाठी अरेबिका चेर्रीजचा वापर केला जातो.
ही कॉफी ग्वाटेमालाच्या हुएहुएतेनांगो क्षेत्रातील इजेरतो या फळापासून बनवली जाते. त्यामुळे या कॉफीची चव फ्रूटी असते. इतर कॉफीच्या तुलनेत याची चव गोड असते. या कॉफीमध्ये फ्रूटी फ्लेवरसोबत चॉकलेटी फ्लेवरसुद्धा मिळतो. या कॉफीची किंमत 50 डॉलर एवढी आहे.
या कॉफीच्या नावाप्रमाणे ही कॉफी जमाइकाच्या ब्लू पर्वतीय क्षेत्रात उगवली जाते. या कॉफीचे उत्पादन फक्त याच भागात होते. पर्वतीय क्षेत्र असल्या कारणाने कॉफी पिकवण्यास फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे ही कॉफी महाग असते. या कॉफीची किंमत १४० डॉलर एवढी असते. (International Coffee Day)
दक्षिण अटलांटिक महासागरातील आयलँडवर उगवली जाणारी कॉफी ग्रीन टिप्ड बॉरबॉन अरेबिका बीन्सपासून बनवली जाते. ही कॉफी फक्त याच जागी उगवली जात असल्या कारणाने ही कॉफी फार खास असते. ही कॉफी या पर्वतीय क्षेत्रातून निर्यात केली जाते. त्यामुळे ट्रान्सपोर्टिंग चार्जेसही फार जास्त लागतात. म्हणून ही कॉफी फार महाग असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.