Human Rights Day: नुकतंच इंडोनेशिया या देशाने लग्नाआधी शारीरिक संबध ठेवणे गुन्हा असून त्याला कायदेशीर गुन्हा असल्याचे घोषित केले आहे. या कायद्याला मंगळवारी संसदेत मंजुरीही मिळाली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाने पर्यटकांमध्येही संताप निर्माण झालाय. मात्र लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणे खरंच गुन्हा आहे काय? त्याबाबत देशभरातील कायदे काय सांगतात आपण जाणून घेऊया.
लग्नाआधी सेक्सबाबत कोणत्या देशात काय सांगतो कायदा?
भारत - भारतीय मानवी हक्क सांगतो की, संमतीने सेक्स करणे हा गुन्हा नाही. त्यासाठी दोन्ही पक्ष हे अल्पवयीन नसावे. जर तुम्ही लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर मुलीशी लग्न करण्यास नकार दिला तर ती तुमच्याविरुद्ध बलात्काराची पोलिस तक्रार करू शकते. भारतात IPC कलम 420 अंतर्गत मुलीशी शारिरीक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्यास लग्न करण्याच्या भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो.
अमेरिका - 1920 च्या दशकापासून आणि विशेषतः द्वितीय विश्वयुद्धानंतर, विवाहपूर्व लैंगिक संबंध अधिक सामान्य झाले, यात विशेषतः स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक होते. 20 व्या शतकाच्या अखेरीस, 75 ते 80 टक्के अमेरिकन लोकांनी वयाच्या 22 व्या वर्षापूर्वी योनिमार्गाचा संभोग अनुभवला होता. याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. उदा, लग्नाचे वाढते मध्यम वय आणि गर्भनिरोधक औषधांची व्यापक उपलब्धता यांचा समावेश आहे.
तुर्कस्तान (टर्की) - तुर्कस्तानमध्ये विवाहबाह्य सेक्स बेकायदेशीर नाही. तुर्कस्तान एक धर्मनिरपेक्ष (किमान, अजूनही) देश आहे आणि असे कायदे नाहीत. होय, काही लोक लग्नापूर्वी सेक्स करतात आणि काही करत नाहीत.
जपान - सप्टेंबर 2019 मध्ये जपानमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात, बहुसंख्य लोकांनी लग्नापूर्वी लैंगिक संबंध न्याय्य असल्याचे सांगितले आहे.
अनेक देशांत त्यांच्या मान्यतेनुसार लग्नापूर्वी लैंगिक संंबंधांबाबत वेगवेगळ्या तरतुदी तुम्हाला बघायला मिळतील. मात्र स्वेच्छेने शारिरीक संबंध ठेवण्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाता कामा नये असे एकदंरीत सगळ्याच देशातील तरुणांचे म्हणणे पडले. त्यामुळे इंडोनेशियाच्या नव्या कायद्याने देशातील नागरिकांबरोबर पर्यटकांवरही हा कायदा लादल्याने तेही भडकलेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.