Mountain Day Special: अप्रतिम सौंदर्य अन् मनमोहक दृष्य! या पर्वतावर जायचा सोपा मार्ग जाणून घ्या

मित्ताने मनाला प्रसन्न करणाऱ्या तसेच मनमोहक पर्वतरांगा असलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया
Mountain Day Special
Mountain Day Specialesakal
Updated on

International Mountain Day: आज इंटरनॅशनल माउंटेन डे आहे. पर्वतरांगा म्हटलं की आठवतं ते निसर्गरम्य ठिकाण आणि मनाला प्रसन्न करणारं ठिकाण. या दिवसाच्या निमित्ताने मनाला प्रसन्न करणाऱ्या तसेच मनमोहक पर्वतरांगा असलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

हिमालयातील कैलास पर्वत हे सगळ्यांनाच माहित आहे. कैलास मानसरोवर संपूर्ण हिमालय क्षेत्रातील सर्वात जास्त अध्यात्मिक संवेदना असणारा भाग मानला जातो. याठिकाणी साक्षात महादेवाचा अनुभव केला जाऊ शकतो असे मानले जाते. या पर्वताला गणपर्वत आणि रजतगिरी असेही म्हणतात. मानसरोवराची यात्रा व्यास, भीम, कृष्ण, दत्तात्रय इ. केली आहे. या व्यतिरिक्त विविध ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले आहे. काही लोकांच्या मतानुसार आदी शंकराचार्यांनी याच पर्वताच्या जवळपास देहत्याग केला होता. शिवपुराणामध्ये या जागेला ब्रह्मांडाचे केंद्र सांगण्यात आले आहे.

या पर्वताचे दृष्यही अगदी मनमोहक आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे फिरायला जातात. येथील निसर्गरम्य दृष्य बघून तुम्हाला स्वर्गाची अनुभूती होईल. कैलास पर्वतावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग भारताच्या उत्तराखंड राज्यातून जातो, परंतु हा खूपच धोकादायक मार्ग आहे. दुसरा मार्ग थोडा सोपा आहे. जो नेपाळची राजधानी काठमांडूपासून जातो. आज आपण नेपाळ मार्गावरून भगवान महादेवाच्या कैलास पर्वतावर कसे पोहचावे याची माहिती देत आहोत.

Mountain Day Special
Best Winter Tourist Spots: भारतात हिवाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणे एकदम बेस्ट; सहलीचा आनंद होईल दुप्पट

कैलास यात्रेला जाण्याची प्रोसेस

सर्वात आधी भारताची राजधानी दिल्लीमध्ये सर्व नियमांची पूर्तता केली जाते. त्यानंतर आरोग्य तपासणी करून थेट काठमांडूला नेले जाते. तुम्ही काठमांडूला एक दिवस मुक्काम करून दुसर्‍या दिवशी यात्रा सुरु करू शकता. अनेक भक्त येथील पशुपतीनाथाचे दर्शन करून पुढे कैलास दर्शनाची यात्रा सुरु करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.