नवी दिल्ली : बब्बर खालसा या खलिस्तानवादी गटाचा दहशतवादी करणवीर सिंग याच्याविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली आहे. त्यामुळं आता खलिस्तानवाद्यांविरोधात भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर कारवायांनी वेग घेतल्याचं चित्र आहे. कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येनंतर या कारवायांना वेग आला आहे. (Interpol has issued a Red Corner Notice against Karanvir Singh Babbar Khalsa International)
सुत्रांच्या माहितीनुसार, कपूरथला इथला रहिवासी असलेला करणवीर सिंग सध्या पाकिस्तानात राहतो आहे. करणवीर हा बब्बर खालसा या खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या गटाचे वरिष्ठ दहशतवादी वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंदा यांचा उजवा हात समजला जातो. हे दोघेही भारतातून फरार असून पाकिस्तानात जाऊन लपले आहेत.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत हातमिळवणी करुन ते भारताविरोधात कटकारस्थान करत असतात. करणवीर सिंग याच्यावर हत्या, खंडणी, टेरर फंडिंग, दहशतवादी कट यासारखे गुन्हे दाखल आहेत.
एनआयएनं २३ जुलै रोजी बब्बल खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) आणि खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत. ड्रग्जच्या तस्करीतून दहशतवादी बनलेले हरविंद सिंग संधू ऊर्फ रिंदा तसेच अर्शदीप सिंग ऊर्फ अर्श डाला, लखबीर सिंग संधू हे परदेशात राहून भारतविरोधी कारवयांमध्ये गुंतलेले आहेत.
दरम्यान, करणवीर सिंग याच्याविरोधात इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस काढल्यानं आता तो जगात कुठेही लपून बसला असला तरी तिथल्या स्थानिक पोलिसांना त्याला ताब्यात घ्याव लागेल. त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. त्यामुळं भारतासाठी ही मोठी बाब मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.