iPhone Survives Crash : तब्बल 16,000 फूट उंचीवरील विमानातून खाली पडला आयफोन, तरीही अगदी सुस्थितीत! फोटो होतोय व्हायरल
Alaska Airlines iPhone Crash : आपले फोन अगदी मजबूत असतात असा दावा अॅपल कंपनी सातत्याने करत असते. मात्र, कित्येक वेळा अगदी थोड्या उंचीवरुन पडूनही आयफोनच्या स्क्रीनला तडा गेल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे यूजर्स या बाबतीत आयफोनला ट्रोल करत असतानाच, एका घटनेमुळे सर्व ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे. कारण तब्बल 16 हजार फुटांवरून खाली पडलेला एक आयफोन अगदी सुस्थितीत आढळून आला आहे.
काही दिवसांपूर्वी अलास्का एअरलाईन्सच्या एका विमानाचा दरवाजा हवेतच उघडला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. यादरम्यान विमानातील एक आयफोन बाहेर उडून गेला होता. हा आयफोन जमीनीवर पडला, मात्र तरीही तो सुस्थितीत आणि चालू होता.
बार्न्स रोड नावाच्या एका ठिकाणी राहणाऱ्या सीनाथन बेट्स नावाच्या एका व्यक्तीला हा फोन मिळाला. या फोनचं कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर अशा गोष्टीही सुस्थितीत होत्या. बेट्स याने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. तसंच या फोनचा फोटोही त्याने शेअर केला.
"मला रस्त्याच्या कडेला हा आयफोन मिळाला. हा आयफोन एअरप्लेन मोडवर आहे, यामध्ये अर्धं चार्जिंग शिल्लक आहे. तसंच अलास्का एअरलाईन्सच्या ASA1282 या फ्लाईटचं बॅगेज क्लेम असणारा ईमेल यात ओपन आहे. तब्बल 16 हजार फूट उंचीवरुन पडूनही हा फोन सुस्थितीत आहे." असं बेट्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरवाजाचा पत्ताच नाही!
आपल्या पोस्टमध्ये तो पुढे लिहितो, "मी याबाबत माहिती देण्यासाठी NTSB अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, मला असं समजलं की विमानातून पडून सुस्थितीत सापडलेला हा दुसरा फोन आहे. या विमानाचं दार अजूनही मिळालं नाही.."
नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
यावर नेटकऱ्यांनी अगदी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. "या फोनचं कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर कोणत्या कंपनीचा होता हे फक्त सांगा", "शक्यच नाही! माझा आयफोन टेबलवरुन खाली पडला होता आणि खराब झाला", "माझा तर खिशातून पडला तरी खराब झाला होता.." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एक्स यूजर्सनी दिल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.