Iran Airstrike On Pakistan : इराणची पाकिस्तानात एअरस्ट्राइक! दहशतवादी ठिकाणांवर केला हल्ला

इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या पंजगूर मध्ये ही एअर स्ट्राईक करण्यात आली आहे.
iran airstrike in pakistan panjgur balochistan on  jaish ul adal marathi news
iran airstrike in pakistan panjgur balochistan on jaish ul adal marathi news
Updated on

Iran Airstrike On Pakistan : इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या पंजगूर मध्ये ही एअर स्ट्राईक करण्यात आली आहे. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले करण्यात आल्याचे इराणकडून दावा करण्यात आळा आहे. पण अद्याप या हल्ल्याला पाकिस्तानने दुजोरा दिलेला नाही किंवा नाकार देखील केलेला नाही.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) पाकिस्तानातील जैश अल अदल या सुन्नी बलोच दहशतवादी संघटनेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील जैश-अल-अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. या दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात इराणच्या सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

इस्रायल-हमास संघर्षावरून मिडल इस्टमध्ये तणाव वाढला असतानाच इराणने पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला आहे. त्यामुळे हा संघर्ष जास्त पेटण्याची शक्यता आहे.

iran airstrike in pakistan panjgur balochistan on  jaish ul adal marathi news
Weather Update : निम्मा महाराष्ट्र गारठला! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद; पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार

जैश-अल-अदल का आहे?

जैश-अल-अदल हा इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी दहशतवादी गट आहे. हा गट पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण म्हणूनही ओळखला जातो. पूर्वी या संघटनेचे नाव जुंदअल्लाह होते पण 2012 मध्ये त्याचे नाव बदलून जैश-अल-अदल करण्यात आले. या संस्थेची स्थापना 2002-2003 मध्ये झाली.

iran airstrike in pakistan panjgur balochistan on  jaish ul adal marathi news
Sakal Podcast : शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()