Prophet Muhammad Row: भारताच्या भूमिकेवर इराणचे परराष्ट्रमंत्री समाधानी

मोहम्मद पैगंबरावर टीका केल्याप्रकणी आखाती देशांनी भारताला धारेवर धरले आहे.
Prophet Muhammad Row News
Prophet Muhammad Row NewsPRINT-124
Updated on

नवी दिल्ली : सध्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबरावर टीका केल्याप्रकणी आखाती देशांनी भारताला धारेवर धरले होते. त्याचबरोबर जगभरातील अनेक इस्लामी राष्ट्रांनी याबाबत भारतावर टीका केली होती. त्यानंतर भारताने टीका करणाऱ्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री यांनी भारताच्या भूमिकेवर समाधानी असल्याचं म्हटलंय.

(Iran Foreign Minister Satisfied with India's Stand)

Prophet Muhammad Row News
गंगायान : भारत 2023 मध्ये राबवणार सागरी आणि अंतराळ मानवी मोहीम

पैगंबरावर टीका केल्याप्रकरणी भारताने जी भूमिका घेतली आहे त्यावर इराण समाधानी आहे असं भारत भेटीवर आलेले इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिर अब्दुल्लाहीन यांनी म्हटलं आहे. त्यांची पद स्विकारल्यापासून पहिली भारत भेट आहे. भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी पैगंबरावर टीका केल्याप्रकणी त्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची काल दिल्लीत भेट घेतली आहे.

दरम्यान अजित डोवाल यांनी सांगितलं की, "भारत आणि भारताचे प्रशासन मोहम्मद पैगंबराचा आदर करतात, पण ज्यांनी पैगंबराबाबत अपशब्द वापरले आहेत त्यांना आम्ही पदावरून काढलं आहे." असं डोवाल म्हणाले. त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री भारताच्या या भूमिकेवर समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Prophet Muhammad Row News
'ना हिंदुत्वावर ना नामांतरणावर, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा': संदीप देशपांडे

दरम्यान नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जगभरातून या वक्तव्यामुळे टीका केली जात होती. आखाती देशांनी भारताला माफी मागण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणानंतर भाजपाने शर्मा आणि जिंदाल यांची हकालपट्टी केल्यावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.