हिजाबला हवेत फेकत महिला धार्मिक पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
Iran Hijab Row : इराणमध्ये महिला (Iran Women) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत त्या इराणमधील धार्मिक पोलिसांच्या (Morality Police Iran) विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीमुळं 22 वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्यानं महिला संतापल्या आहेत. तीचा दोष एवढाच होता की, तिनं हिजाब नीट परिधान केलेला नव्हता.
इराणी महिलांना हिजाब घालण्याची अट 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाली. त्यापूर्वी, शाह पहलवीच्या राजवटीत इराण स्त्रियांच्या पोशाखाच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र होता. मात्र, आता चुकीच्या पद्धतीनं हिजाब परिधान केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहसा अमीनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधात उग्र निदर्शनं होत आहेत.
एकीकडं हे आंदोलन हळूहळू मोठं होत असताना दुसरीकडं पोलीस आणि प्रशासन महिलांवर आक्रमक कारवाई करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी 700 हून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे.
एवढंच नाही तर इराण सरकारनं व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम यांसारख्या संवाद माध्यमांवर बंदी घातली आहे. या कारवाईत शेकडो कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं मृतांची संख्या 41 असल्याचं सांगितलं. तर इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला आग लावली असून त्यामुळं सर्वांवर ही कारवाई करण्यात येत आहे, असं स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणादरम्यान इराण ह्युमन राइट्सनं दावा केलाय की, सुरक्षा कर्मचारी वगळता मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 54 आहे. मझांदरान आणि गिलान प्रांतांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इथं आंदोलन करणाऱ्या महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.