Israel-Hamas War: बदल्याची आग! इस्माईलच्या हत्येनंतर इराणच्या मुख्य मशिदीवर लाल झेंडा फडकला; 'हे' आहे कारण...

Ismail Haniyeh: इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या वतीने एक स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं आहे. त्यात हानीयेह यांच्या हत्येचा निषेध करण्यात आलाय. इराणने हमास प्रमुखाच्या हत्येला भ्याड हल्ला म्हटलं आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas Waresakal
Updated on

नवी दिल्लीः हमासचा प्रमुख इस्माईल हनीयेह याच्या हत्येनंतर इराण येथील कोम जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज फडकला आहे. हा झेंडा सूडाचं प्रतिक समजला जातो. दोन्ही देशांमध्ये भविष्यात तणाव वाढू शकतो, असं सध्या दिसून येतंय. इस्माईन हनीयेह हे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधीसाठी इराणमध्ये होते.

हत्येच्या काही वेळ अगोदर सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं होतं. दोघांचे फोटोही पुढे आले होते. खामेनेई यांनी मीडियाच्या वतीने एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. ज्यात हानीयेह सुप्रीम नेत्याला भेटत असल्याचं दिसून येतंय आणि त्यांनी एकमेकांशी गळाभेटही घेतली होती.

Israel-Hamas War
Indapur Crime : हैवान कारकून! अतिप्रसंगाला विरोध केला म्हणून पाजलं कीटकनाशक; अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या वतीने एक स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं आहे. त्यात हानीयेह यांच्या हत्येचा निषेध करण्यात आलाय. इराणने हमास प्रमुखाच्या हत्येला भ्याड हल्ला म्हटलं आहे.

'रिव्हॉल्यूशनरी गार्ड'ने म्हटलं की, हानीयेह यांची हत्या इस्राईलने गाझामधील आपलं अपयश झाकण्यासाठी आणि जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी केली आहे. अत्याधुनिक हत्यारं घेऊन मागच्या ९ महिन्यांपासून इस्रायली सेना तैनात आहे. तरीही त्यांना यश मिळालं नाही. गाझामध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्धांना छळल्याच्या प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.

Israel-Hamas War
VIDEO : एका ठोशात खाली पाडलं... बिर्याणीच्या वजनावरून दुकानदार-ग्राहक भिडले; माजी सैनिकाला बेदम मारहाण

लाल झेंड्याचा अर्थ काय?

कोम येथील मशिदीवर लावलेला लाल झेंडा इराणमध्ये नेहमी लावला जातो. शहिदांच्या खूनाचं प्रतिक म्हणून त्याकडे बघितलं जातं. विशेषतः मुहर्रमच्या वेळी हा लाल झेंडा फडकवला जातो. या झेंड्यावर अरबी भाषेमध्ये मजकूर लिहिलेला आहे. 'हे हुसेनचा बदला घेणारे...' असं त्यावर लिहिलेलं आहे.

कोण होता हनीयेह?

गाझाच्या शती निर्वासित छावणीत 1963 मध्ये जन्मलेल्या इस्माइल हनीयेहने संयुक्त राष्ट्रांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले होते. त्याने गाझा इस्लामिक विद्यापीठातून 1987 मध्ये अरबी साहित्यात पदवी प्राप्त केली. विद्यापीठात असतानाच, तो हमासमध्ये सामील झाला होता. 1987 मध्ये पॅलेस्टाईनच्या लोकांनी गाझा पट्टीत इस्रायलच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला 'पहिला इंतिफादा' असेही म्हणतात. त्यावेळी इस्त्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये भीषण संघर्ष झाला होता. या संघर्षात इस्माईल हनीयेहनेही भाग घेतला होता. त्यानंतर इस्माईल हनीयेहला इस्रायलने तुरुंगात टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.