Pakistan Iran War: इराणने पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. इराणच्या लष्कराने जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माईल शाहबक्ष आणि त्याच्या साथीदारांचा खात्मा केला आहे, असे इराण इंटरनॅशनल इंग्लिशने सरकारी मीडियाच्या हवाल्याने वृत्त दिले.
अलीकडच्या काळात इराण आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले आहेत. जागतिक नियम मोडून इराण घुसत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे, तर इराणही पाकिस्तानवर असेच आरोप करत आहे.
इराणने जैश अल-अदलला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली आहे. ही संस्था २०१२ साली अस्तित्वात आली. अल अरेबिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, ही संघटना दक्षिण-पूर्वेकडील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे. ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे.
इराण आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश राजनैतिक प्रयत्न करत आहेत. दोन मित्र देशांमधील तणाव थांबत नाही. एकमेकांवर हवाई हल्ले होत असल्याने परिस्थिती बिकट होत आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि इराणने सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे मान्य केले होते, आता हा करार मोडीत निघताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी आणि त्यांचे इराणी समकक्ष होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांचे प्रयत्न कामी येत नाहीत.
इराण आणि पाकिस्तान यांच्यातील दहशतवादी संघटनांविरोधात केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराणच्या हल्ल्यात नागरिक मारले जात असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानने इराणमधून आपले राजदूत परत बोलावले आहेत. तर इराण त्यांच्या सार्वभौमत्वाला हानी पोहोचवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानने इराणमध्ये राहणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) यांसारख्या संघटनांवर हल्ला केला होता. राजनयिक चर्चेत जी स्थिरता होती ती पुन्हा एकदा भंगली आहे. पाकिस्तान आणि इराण पुन्हा एकमेकांवर हल्ले करत आहेत.
यापूर्वी इराणने १६ जानेवारीच्या रात्री उशिरा पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले, ज्यामुळे जैश अल-अदल (न्याय सैन्याची) दोन महत्त्वाची मुख्यालये नष्ट करण्यात आली. पाकिस्तानचा आरोप आहे की हल्ल्यात दोन मुले ठार झाली आणि तीन मुली जखमी झाल्या होत्या. त्यानंतर १८ जानेवारी रोजी, पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल इराणमध्ये हल्ले केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.