मुलींच्या लग्नाचे वय किती असावे याबद्दल अनेकदा चर्चा होताना आपण पाहातो. यादरम्यान इराकच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या एका विधेयकाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकात लग्नासाठी मुलींच्या किमान वयाची अट कमी करून ९ वर्ष इतकी करण्यात आली आहे. इराकच्या कायदेमंत्रालयाकडून या कायद्यासंबधीचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला आहे.