सीरियात ISIS च्या म्होरक्याचा खात्मा; अमेरिकेचा दावा

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
joe biden
joe biden
Updated on

वॉशिंग्टन : आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने थेट पाहिल्यादा देखील दावा करण्यात आला आहे. ''अमेरिकेच्या आणि शेजारील मित्र राष्ट्रांमधील लोकांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकन सैन्याने जगातील सर्वांत सुरक्षित स्थान बनवण्यासाठी सिरियामध्ये बुधवारी रात्री दहशतवाद रोखण्यासाठी कारवाई सुरु केली होती.'' असे व्हाईट हाउसने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अल कुरेशीने त्याच्या कुटुंबासह स्वत:ला बॉम्बस्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान सहा मुले आणि चार महिलांसह 13 जणांचा मृत्यू झाला असून, मिशनमधील सर्व अमेरिकन सैनिक सुखरूप परतले असल्याचे अमेरिकन प्रशासनाच्या म्हटले आहे. या मिशनमध्ये 24 स्पेशल ऑपरेशन कमांडोचा समावेश होता, ज्यांच्या सोबत जेट्स, रीपर ड्रोन आणि हेलिकॉप्टर गनशिप होते. "ऑपरेशनच्या सुरूवातीला, दहशतवादी लक्ष्याने बॉम्बचा स्फोट केला, ज्यात महिला आणि मुलांसह तो आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला," असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

joe biden
सीरियात अमेरिकन महिला चालवायची ISIS दहशतवादी संघटना, आता FBI च्या ताब्यात

अमेरिकन माध्यमांच्या अहवालानुसार अल्-कुरेशी हा 2004 पासून ईराकमधील बुक्का येथील US रन कॅम्प येथे तुरुंगात डांबला गेला होता. तो अगोदर ISIS या दहहशतवादी संघटनेत काम करायचा त्यानंतर तो अबू बकर अल् बगदादी या ISIS प्रमुखाचा खास प्रतिनिधी बनला होता असं अहवालात म्हटलं आहे. तसेच अल् कुरेशी हा याझिदीमधील धार्मिक हत्याकांडाचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो. बगदादीच्या मृत्यूनंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईला रोखून दहशतवादी संघटनेला वाचवण्याचं कामही मारल्या गेलेल्या अल्-कुरेशी याने केलं होतं. तसेच अमेरिकेने अल्-कुरेशी याची माहीती पुरवण्यासाठी दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.