ISKP Threat to India: भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKP ची भारताला धमकी

ISKP Threat to India: 'व्हॉइस ऑफ खुरासान' मासिकातील एका लेखात ISKP सैनिक भारतातील प्रार्थनास्थळांवर रक्तपात करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या लेखामध्ये भारत आणि तालिबान यांच्यातील संबंधांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
ISKP Threat to India
ISKP Threat to IndiaEsakal
Updated on

ISKP Threat: रशियावरील हल्ल्यानंतर आता इस्लामिक स्टेट खोरासानने भारताला धमकी दिली आहे. 'द इस्लामिक स्टेट विल एन्ड्युअर' शीर्षकाच्या लेखात ISKP नष्ट करण्याच्या तालिबानच्या दाव्यांची खिल्ली देखील उडवली आहे. आयएसकेपीने अफगाणिस्तानच्या रक्ताने इराणची भूमी रंगवली, असे ही या लेखात म्हटले आहे.

खोरासानमध्ये आयएसकेपी मजबूत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लेखात 'जगातील सर्व काफिर आणि इस्लामी देशांतील त्यांच्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराची किंमत चुकवावी लागेल' अशी धमकी देण्यात आली आहे.

ISKP Threat to India
Pandemic News : दुसरी महामारी कधीही धडकू शकते...; युकेमधील शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

हा लेख 'व्हॉइस ऑफ खुरासान' मासिकाच्या नवीन आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. 'द स्पायडर हाऊस' या त्याच नियतकालिकातील दुसऱ्या लेखात ISKP ने चेतावणी दिली आहे की, तालिबान आणि इतर पाश्चात्य इस्लामिक देशांकडून काफिरांना संरक्षण दिले जाणार नाही. ISKP ने म्हटले आहे की, ते काफिरांच्या या संरक्षकांना लवकरच पराभूत करेल आणि अमेरिका, युरोप, चीन, भारत इराणमध्ये पोहोचेल.

ISKP Threat to India
Moscow Concert Hall Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचं युक्रेनशी कनेक्शन? पुतीन सरकारचा आरोप; ११ जण ताब्यात

'व्हॉईस ऑफ खुरासान' मासिकात 'द इंडियन किंग्स अँड तालिबान सर्व्हंट्स' नावाचा लेख प्रसिद्ध झाला असून, त्यात ते भारतातील प्रार्थनास्थळांवर रक्तपात करतील, असे म्हटले आहे. त्यात भारत आणि तालिबान यांच्यातील संबंधांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.