Israel-Hamas War: इस्राइलचा तोफगोळा चुकून इजिप्तच्या ठिकाणावर पडला; युद्धाला लागणार वेगळे वळण?

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

तेल अवीव- इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असताना एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इस्राइलच्या रणगाड्यामधून सोडलेला एक तोफगोळा चुकून इजिप्तच्या एका पोस्टवर पडला आहे. त्यामुळे संघर्षाला धार येण्याची शक्यता आहे. इस्राइलच्या रगणाड्यातून निघालेला तोफगोळा इजिप्तच्या केरेम शॅलोम सीमेलगत असलेल्या ठिकाणावर पडले आहे. (Israel Defense Forces IDF tweets IDF tank accidentally fired and hit an Egyptian post adjacent to the border in the area of Kerem Shalom)

इस्राइलच्या डिफेन्स फोर्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे. फोर्सने म्हटलं की, काही वेळापूर्वी, आयडीएफच्या रगणाड्यामधून चुकून एक तोफगोळा इजिप्तमध्ये सीमेलगत असलेल्या केरेम शॅलोम या भागावर पडले आहे. या घटनेचा तपास केला जात आहे. या घटनेबद्दल इस्राइल डिफेन्स फोर्सला दु:ख आहे.

Israel-Hamas War
Israel Hamas War : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, दोघेही लोकशाहीचे शत्रू...

इस्राइल आणि हमासमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. ७ ऑक्टोंबर रोजी हमासने इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने प्रतिहल्ला करत युद्धाची घोषणा केली. सध्या इस्राइल गाझा पट्टीमध्ये विध्वंस करत आहे. दुसरीकडे, लेबनॉनमधून हिजबुल्ला इस्राइलवर रॉकेट हल्ले करत आहे. त्यामुळे इस्राइलला दोन पातळ्यांवर लढावं लागत आहे. युद्ध अन्य प्रदेशात पसरू नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.

अशा परिस्थितीत इस्राइलकडून इजिप्तवर चुकून तोफगोळा डागण्यात आला आहे. त्यामुळे इजिप्त या हल्ल्याला कसा घेईल हे पाहावं लागणार आहे. इस्राइलने हा हल्ला चुकून झाल्याचं म्हटलं आहे. त्याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. पण, अशा प्रकारचा हल्ला चुकूने कसा होऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Israel-Hamas War
Irfan Pathan : इरफान पठाणनं इस्त्राइल - हमास युद्धावर केलं ट्विट; कोणाची घेतली बाजू?

काही दिवसांपूर्वी गाझा पट्टीतील एका मशिदीवर हल्ला झाला होता. इस्राइलने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण, इस्राइलने हा हल्ला आपण केला नसल्याचा दावा केला. उलट हमासच्या दुसऱ्या गटाने हा हल्ला केल्याचा आरोप केला. या घटनेमुळे जागतिक पातळीवर रोष पाहायला मिळाला होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.