तेल अवीव: कोरोना व्हायरसच्या महामारीदरम्यान इस्त्रायलने आपल्या जनतेसाठी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया 27 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. इस्त्रायलने कोरोना लशीसाठी फायझर कंपनीसोबतच करार केला आहे. या लशीची पहिली खेप तेल अवीवपर्यंत पोहोचली असल्याचीही माहिती मिळत आहे. इस्त्रायलने पहिल्या खेपेमध्ये लशीचे जवळपास 80 लाख डोस ऑर्डर केले आहेत.
याआधी ब्रिटन आणि कॅनडा या देशांनीही फायझर लशीच्या आपत्कालीन परिस्थितीतील वापराला मानयता दिली आहे. त्यानंतर आता इस्त्रायल हा देश सुद्धा या उंबरठ्यावर आहे. कार्गों अनलोडिंगच्या दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी बुधवारी म्हटलं की, देशाला आनंदीत झालं पाहिजे. हा एक मोठा उत्सव आहे. आपण 27 डिसेंबर रोजी पहिली लस देणार आहोत. आता याची मोहिमच सुरु होईल. दररोज जवळपास 60 हजार लस दिल्या जातील.
फायझरच्या लशीला अद्याप इस्त्रायलमध्ये वापरासाठी आवश्यक त्या औपचारिक मंजूरी प्राप्त झाली नाहीये. मात्र, नेतन्याहू यांनी म्हटलं की, ते आरोग्य मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे प्रमुखांसोबत गुरुवारी बैठक करतील जेणेकरुन देशव्यापी स्तरावर लसीकरणासाठी योजना आखता येईल. तिसऱ्या फेजच्या ट्रायल दरम्यान फायझरच्या कोरोना लशीच्या लक्षणांना रोखण्यासाठी 90 टक्के यशस्वी झाल्याचे निष्पन्न झालं आहे. तसेच या लशीचा कसलाही विपरीत परिणाम दिसून आला नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.