Israel-Hamas Conflict : आमच्यासाठी हे 9/11 सारखे; इस्त्राइल हमासवर हल्ले करणार आणखी तीव्र

इस्त्राइल हमास यांच्यामध्ये युद्ध पेटलं आहे.
israel palestine conflict
israel palestine conflict Sakal
Updated on

इस्त्राइल आणि हमास यांच्यामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. यादरम्यान इस्त्राइल सरकारने या हल्ल्याला ९/११ सारखा हल्ला म्हटले आहे. २०११ साली सप्टेंबर महिन्यात अल-कायदाने अमेरिकेत ङल्ला केला होता. इस्त्राइलने यासोबतच पॅलेस्टाईन मधील दहशतवादी संघटनेवर वृद्ध आणि लहान मुलांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या संघर्षात आतापर्यंत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्त्राइल सेनेच्या प्रवक्त्याने सांगितलं की, हे आमच्यासाठी ९/११ सारखे आहे. तसेच त्यांनी आरोप केला की हमासला इस्त्राइलचा विनाश करायचा आहे. त्यांच्याकडून ज्येष्ठ तसेच सामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या युद्धादरम्यान आतापर्यंत जवळपास ६०० इस्त्रायली नागरिक ठार झाले आहेत. तर ४०० जखमी झाले आहेत. तर पॅलेस्टाईनमध्ये हा आकडा ४१३ इतका सांगितला जात आहे.

israel palestine conflict
Israel Iron Dome : इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या

इस्त्राइलच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, हमासने तब्बल १०० सैनिकांचे आणि सामान्य नागरिकांचे अपहरण केले आहे. सेनेचे प्रवक्ते रिचर्ह हेच्ट यांनी सांगितलं की दहशतावाद्यांनी घरांमध्ये घुसून तोडफोड केली आणि सामान्य नागरिकांवर देखील हल्ले केले. शेकडो दहशतवाद्यांनी शहरांवर हल्ला केला आणि आद्यापही शेकडो दहशतवादी इस्त्राइलमध्ये सैन्याशी लढत आहेत.

दरम्यान इस्त्राइलने हमासच्या विरोधात सैन्य कारवाई तीव्र करण्याची तयारी केला आहे. मीळालेल्या वृत्तानुसार, इस्त्राइलच्या सिक्युरिटी कॅबेनेट ने महत्वपूर्ण लष्करी पावले उचलण्यास एकमत झालं आहे. दरम्यान यामध्ये कुठले उपाय केले जातीय याबद्दल निश्चितता नाहीये मात्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा मिळताना दिसत आहे.

israel palestine conflict
Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईन-इस्त्राईल वादाचे नक्की परिणाम काय होणार ?

शनिवारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर हजारो मिसाईल डागले. इस्त्राइलच्या शहरांना तसेच सैन्य तळांना टार्गेट करण्यात आले. हमास चीफ हानियाह याचा दावा आहे की त्यांचा गटा मोठ्या विजयाच्या दवळ होता. याला उत्तर देत इस्त्राइलने गाझा पट्टी भागात अनेक ठिकाणांवर हल्ला चढवला.

वाढत्या संघर्षादरम्यान संयुक्त राष्ट्र देखील संक्रीय झालं आणि बैठक बोलवण्यात आली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी इस्त्राइलाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर हिजबुल्लाहने हमासला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.