Israel War: इस्त्राइल-हमास संघर्षातील 5 मोठे दावे निघाले खोटे; तुम्हालाही खरे वाटत होते का? जाणून घ्या

5 major claims in the Israel-Hamas conflict turned out to be false...
Israel War
Israel WarEsakal
Updated on

जेरुसलम- शनिवारपासून इस्त्राइल आणि पॅलेस्टिनमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर संघर्षग्रस्त प्रदेशातून विविध फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. यातील काही बातम्या, फोटो आणि व्हिडिओ चुकीचे असल्याचं कळत आहे. यासंदर्भात पाच मोठे मुद्दे खोटे असले तरी खरे असल्याचं भासवून पसरवले जात आहेत. याची सत्यता आपण जाणून घेऊया..

इस्त्राइलचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

जुनैद राजपूत नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात हमासचा दहशतवादी इस्त्राइलचे हेलिकॉप्टर पाडत असल्याचं सांगण्यात आलं आहे. बीबीसीने यावर खुलासा केलाय की ही क्लीप एका व्हिडिओ गेममधील आहे. या पोस्टला ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे.

Israel War
Israel War
Israel War
Israel-Hamas Conflict : आमच्यासाठी हे 9/11 सारखे; इस्त्राइल हमासवर हल्ले करणार आणखी तीव्र

गाझा पट्टीवर अण्वस्त्र हल्ला

गाझा पट्टीवर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे कधीही गाझा पट्टीत अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, असा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण, ही माहिती खोटी आहे. अशा संदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही.

Israel War
Israel War

नेतन्याहू यांची प्रकृती बिघडली

जेरुसलम पोस्ट नावाच्या एका खोट्या अकाऊंटवरुन दावा करण्यात आलाय की, बेंजामिन नेतन्याहू आजारी पडले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पोस्टला ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. ही माहिती खोटी असल्याचं समोर येत आहेत.

Israel War
Israel War

इस्त्राइलचा हवाई हल्ला

जिम फर्ग्युसन नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अल जझीराचा लोगो आहे. यात दाखवण्यात आलंय की, 'इस्त्राइलने गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे.' हा व्हिडिओ २०२१ चा आहेस तो लेटेस्ट असल्याचं दाखवून शेअर करण्यात आला आहे.

Israel War
Adani Group: इस्राइल-हमास युद्धामुळे अदानी संकटात, शेअर्सच्या किंमतीत घसरण, काय आहे कारण?
Israel War
Israel War

तालिबान हमासला समर्थन देण्यासाठी गाजाला जाणार

तालिबान पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटच्या नावाने एक ट्विट करण्यात आलंय. यात सांगण्यात आलंय की, तालिबान हमासला समर्थन देण्यासाठी गाजाला जाणार आहे. त्यासाठी त्याने इराण आणि इराककडून त्यांच्या भूमीतून जाण्यासाठी परवानगी देखील मागितली आहे. WIONews न्यूजने दिलेल्या माहितीनुसार तालिबानच्या प्रवक्त्याने या वृत्ताचे खंडन केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.