Israel Hamas War : युद्ध थांबेना! इस्राइलकडून निर्वासितांच्या छावणीवर एअर स्ट्राईक; 50 जण ठार

इस्त्राइल हमास युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
Hamas Vs Israel
Hamas Vs Israelsakal
Updated on

इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान आतापर्यंत साडेनऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने उत्तरी गाझामध्ये जबालिया निर्वासितांच्या शिबीरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान इस्त्राइलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये तसेच गाझामध्ये हमासने इस्त्राइली सेनेच्या जवान देखील मारले गेले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार इजिप्तने इस्त्राइल हवाई हल्ल्यांना अमानवीय म्हटले आहे. इजिप्तने हे हल्ले आंतराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इस्त्राइल रुग्णालये निर्वासित छावण्यांवर हल्ले करत आहे. इजिप्तने आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्त्राइलचे हल्ले रोखण्यासाठी आणि गाझामधील निर्वासितांना मानवतावादी मदत देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबत जॉर्डनने देखील कठोर शब्दांमध्ये इस्त्राइली हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच सौदी अरेबिया यांनी इस्त्राइसली सुरक्षा दले नागरिक असलेल्या ठिकाणांवर हल्ल करत आहेत , हे चूक असल्याचे म्हटले आहे.

Hamas Vs Israel
Maratha Reservation : शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू नव्याने ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करणार

मीडिया रिपोर्टनुसार, गाझामध्ये हमासने केलेल्या हल्ल्यामध्ये इस्त्राइली लष्करातील दोन जवानांचा मृत्यू झाला आङे. मृत सैनिकांची नावे सार्जेंट रामत गण आणि सार्जेंट रोई वोल्फ अशी असल्याचे आयडीएफने जाहीर केलं. दोन्ही सैनिक फक्त २० वर्षीय होते. आयडीएफचे म्हणणे आहे की उत्तरी गाझामध्ये दोन्ही जवाना मारले गेले आहेत.

Hamas Vs Israel
Hamas Vs Israel: युद्धाची व्याप्ती वाढणार; उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.