Israel–Hamas war : इस्राईलच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ७६ पॅलेस्टिनींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा धुडकावला

इस्राईलने रविवारी गाझा शहरामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ९० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ७६ जणांचा समावेश आहे.
Israel–Hamas war
Israel–Hamas waresakal
Updated on

राफा : इस्राईलने रविवारी गाझा शहरामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ९० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ७६ जणांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांवर हल्ले न करण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये इस्राईलच्याविरोधात अमेरिकेने कोणताही ठराव होऊ दिलेला नाही. अमेरिकेच्या तीव्र विरोधामुळे गाझामध्ये मदतसाहित्याचे वाटप वेगाने करण्याबाबतचा ठराव झाला, शस्त्रसंधीचा कोणताही उल्लेख ठरावात टाळण्यात आला. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी इस्राईलला आवाहन करताना सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले होते.

मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करताना इस्राईलने रविवारी गाझामधील काही भागावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यापैकी एका घरात एकाच कुटुंबातील ७६ जण राहात होते. या सर्वांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील एक जण संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमात कर्मचारी होता.

Israel–Hamas war
Chandrayaan 3 च्या लँडिंगच्या चार महिन्यांनंतर आनंदाची बातमी! ISRO ला मोठे यश

याशिवाय, जमिनीवरून कारवाई करताना इस्राईलच्या सैनिकांनी गाझामध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांना अटक केली. या सर्वांना चौकशीसाठी इस्राईलमध्ये पाठविण्यात आले आहे. मागील दोन दिवसांत गाझा पट्टीत २०१ जणांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या युद्धात गाझा पट्टीमध्ये वीस हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ५३ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत.

वादग्रस्त व्हिडिओ

गाझामध्ये कारवाई करताना इस्राईलचे सैनिक घराघरांमध्ये घुसून पॅलेस्टिनी युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेत आहेत. या सर्वांच्या अंगावर केवळ एक अंतर्वस्त्र ठेवून बिकट परिस्थितीत डांबून ठेवले जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर इस्राईलवर टीका होऊ लागली आहे. मात्र, शस्त्रतपासणीसाठी या सर्वांच्या अंगावरील कपडे काही काळापुरते काढले होते, असा दावा इस्राईलने केला आहे. इस्राईलने किती जणांना ताब्यात घेतले आहे, ते सर्व जण कोठे आहेत आणि कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती तातडीने जाहीर करावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनांनी केली आहे.

Israel–Hamas war
Corona Virus : रविवारी कोरोनाचे ६५६ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

इस्राईलच्या १२ सैनिकांचा मृत्यू

गाझा पट्टीत जमिनीवरून कारवाई करणाऱ्या इस्राईलच्या सैनिकांची हमासबरोबर ठिकठिकाणी चकमक होत असून मागील दोन दिवसांत अशा चकमकीत १२ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गाझावर इस्राईलची घट्ट पकड असतानाही हमास अद्यापही प्रतिहल्ले करण्याच्या स्थितीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.