Israel-Hamas War: गाझाचे दोन तुकडे, इस्राइली लष्कराने तयार केला मास्टर प्लॅन; विनाश आणखी वाढणार?

अमेरिकेसह अनेक देशांच्या दबावानंतरही इस्राइल गाझामध्ये हल्ले करत आहे
Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal
Updated on

अमेरिकेसह अनेक देशांच्या दबावानंतरही इस्राइल गाझामध्ये हल्ले करत आहे. इस्राइली लष्कराचे म्हणणे आहे की, गाझा दोन भागात विभागला गेला आहे. इस्राइली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, आता तेथे दोन गाझा अस्तित्वात आहेत. एक उत्तर गाझा आणि दुसरा दक्षिण गाझा. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी गाझा आणि इस्राइला भेट देऊन मानवतावादी मदतीसाठी युद्धविराम करण्याची विनंती केली होती.मात्र, हमासचा पूर्णपणे नाश होईपर्यंत युद्धबंदीची घोषणा करणार नसल्याचे इस्राइलचे म्हणणे आहे.

अँटोनी ब्लिंकन यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांचीही भेट घेतली. गाझामध्ये होत असलेल्या हत्याकांडाचा अब्बास यांनी निषेध केला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्राइलच्या हल्ल्यात आतापर्यंत 9770 लोक मारले गेले आहेत.

यातील बहुतांश सर्वसामान्य नागरिक आहेत. गाझामध्ये तिसऱ्यांदा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. एकीकडे अमेरिकेने युद्धबंदीचा पुरस्कार केला तर दुसरीकडे हमासला चिरडण्याचे समर्थनही केले. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्राइलवर हल्ला करून 1400 लोकांना ठार केले होते. याशिवाय 340 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते.

Israel-Hamas War
इस्राइलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३ हजार ९०० मुलांचा मृत्यू, प्रत्येक १० मिनिटांमध्ये एकाचा जीव जातोय; 'गाझा'चा दावा

बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, आम्ही आमच्या शत्रू आणि मित्र दोघांनाही सांगू इच्छितो की, हमासचा संपूर्णपणे खात्मा केला जाईल. आम्ही जिंकेपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. गाझामधील घरांवरही लष्कर हल्ले करत असल्याचे फोटो इस्राइली लष्कराने प्रसिद्ध केले आहे. गाझा येथील एका रहिवाशाने सांगितले की, हा हल्ला भूकंपासारखा आहे. मोठ्या इमारती खाली कोसळल्या आहेत.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित

इस्राइलने पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझा सोडून दक्षिण गाझा येथे जाण्यास वारंवार सांगितले आहे, तरीही बरेच लोक स्थलांतर करण्यास तयार नाहीत. दक्षिण गाझामध्येही इस्राइल हल्ले करत आहे, त्यामुळे तिथेही सुरक्षित राहणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, अमेरिकन अधिकारी म्हणतात की सध्या सुमारे 350,000 लोक उत्तर गाझामध्ये राहत आहेत.

गाझामधील परिस्थिती अशी आहे की लोक दुसर्‍या दिवशी आपल्या मुलांना खाऊ घालू शकतील की नाही हे माहित नाही. ब्लिंकन यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांना गाझा ताब्यात घेण्यास सांगितले होते. सध्या पश्चिम किनार्‍याच्या काही भागांवर त्यांचे नियंत्रण आहे. इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात राजकीय तोडगा निघाला तरच पीएचे गाझामध्ये परतणे शक्य असल्याचे अब्बास म्हणाले.

Israel-Hamas War
India Canada Dispute : ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.