Israel Hamas War: इस्राइलसोबत झालेल्या करारानुसार हमासने 25 ओलिसांची सुटका केली आहे. या ओलीसांमध्ये 12 थाई आणि 13 इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांनी त्यांना गाझा येथे नेले होते आणि नंतर त्यांची सुटका करण्याची अट ठेवली होती.
थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले की गाझामधून 12 थाई ओलिसांची सुटका करण्यात आली आहे आणि दूतावासाचे अधिकारी त्यांना घेण्यासाठी जात आहेत. सुटका करण्यात आलेल्या ओलीसांची नावे आणि इतर तपशील लवकरच कळतील, असे त्यांनी सांगितले. (Global News Update)
इस्राइली न्यूज वेबसाईट i24NEWS च्या वृत्तानुसार, 13 इस्रायली ओलिसांनाही हमासने सोडले असून हमासने त्यांना रेड क्रॉसकडे सुपूर्द केले आहे. सुटका करण्यात आलेले ओलिस रफाह क्रॉसिंगच्या दिशेने जात आहेत. (Latest Marathi News)
यापूर्वी इस्राइल आणि हमास यांच्यातील करारांतर्गत चार दिवसांचा युद्धविराम आज (शुक्रवार) सकाळी लागू झाला. युद्धबंदीनंतर काही तासांनंतरही चकमकी झाल्याचे वृत्त नाही. राजनैतिक प्रगतीमुळे गाझामधील 2.3 दशलक्ष लोकांना काही दिलासा मिळाला आहे. 7 ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यात पकडलेल्या आपल्या नातेवाईकांबद्दल काळजीत असलेल्या इस्राइलमधील कुटुंबांसाठीही ही एक दिलासादायक बातमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.