इस्राइलवर हमासने अचानक केलेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे आणि गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. एकीकडे इस्राइलने गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत, तर दुसरीकडे हमासच्या कृरतेमुळे संपुर्ण जग हादरले आहे. हमासच्या अशाच एका रानटी कृत्याने अमानुषतेची परिसीमा ओलांडली आहे.
हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी एका गर्भवती इस्राइली महिलेलाही सोडले नाही. दहशतवाद्यांनी गर्भवती महिलेची आणि तिच्या पोटातील बाळाची क्रूरपणे हत्या केली आहे. इस्राइल डिफेन्स फोर्स (IDF) ने गर्भवती इस्राइली महिला आणि तिच्या न बाळाची हमासच्या अतिरेक्यांनी क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेची माहिती दिली आहे.
IDF ने एक्सवरती (ट्विटर) पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये दावा केला आहे की, हमासच्या अतिरेक्यांनी गर्भवती महिलेचे पोट फाडले आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा शिरच्छेद केला. IDF ने पुढे सांगितले की, ते X(ट्विटर)च्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे घटनेचा फोटो शेअर करू शकत नाही.
रस्त्यावर गाड्या थांबवून बेछूट गोळीबार, इस्राइलवरील हमासच्या पहिल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल
दक्षिण इस्राइलमधील एका संगीत महोत्सवात हमासने इस्राइलींवर किती क्रूरपणे अत्याचार केले हे दर्शवणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हमासचे दहशतवादी रस्ते अडवून लोकांना कसे थांबवत आहेत आणि अंदाधुंद गोळ्या झाडतात, हे या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
इस्राइल-हमास युद्ध सुरू होऊन 17 दिवस झाले आहेत. ना इस्राइल हमासवरील हवाई हल्ले थांबवायला तयार आहे ना हमास इस्राइली शहरांवर गुप्तपणे रॉकेट डागण्यापासून परावृत्त होत आहे. दरम्यान, त्या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला असून, त्यानंतर युद्ध सुरू झाले आहे. म्हणजेच दक्षिण इस्राइलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. खुद्द इस्राइलने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हे व्हिडीओ शेअर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.