Israel Hamas War : ''आम्हाला कुणीही रोखू शकत नाही'', गाझामध्ये घुसण्यापूर्वी इस्राइलवर हल्ला करुन शकतो इराण

Hamas Hostages : ज्यू की ख्रिश्चन...हमासने ओलीस ठेवलेले 30 देशांतील 199 लोक कोण आहेत?
Israel Hamas War
Israel Hamas Waresakal
Updated on

नवी दिल्लीः इस्राइलकडून गाझावर सातत्याने हल्ले सुरु आहेत. शिवाय गाझामध्ये जमिनीवरुन हल्ला करण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आलंय. मात्र गाझामध्ये घुसण्यापूर्वी इराण इस्राइलवर हल्ला करु शकतो, असं वृत्त आहे.

इराणकडून करण्यात येत असलेली विधानांवरुन इस्राइलच्या कारवाईपूर्वी मोठ्या घडामोडी घडू शकतात. सोमवारी इराणचे परराष्ट्रमंत्री होसैन अमीराबदोल्लाहियान यांनी सांगितलं की, गाझामध्ये जमिनीवरील कारवाईची परवानगी दिली जावू शकत नाही. जर ते असं करत असतील तर त्यांना परिणाम भोगावे लागतील. येणाऱ्या काही तासांमध्ये मोठी कारवाई होऊ शकते, असंही ते म्हणाले.

Israel Hamas War
Hamas Hostages 199 People : ज्यू की ख्रिश्चन...हमासने ओलीस ठेवलेले 30 देशांतील 199 लोक कोण आहेत?

तर मंगळवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले की, जर गाझामध्ये इस्राइलच्या कारवाया सुरुच राहिल्या तर जगभरातील मुस्लिम आणि इराणच्या रेजिस्टेस फोर्सला कुणीही रोखू शकणार नाही.

इराणमधील सरकारी टीव्हीसोबत बोलताना परराष्ट्रमंत्री होसैन अमीराबदोल्लाहियान यांनी सांगितलं की, येणाऱ्या काळात इराणकडून व्यापक प्रमाणात कारवाई सुरु केली जाईल. रेजिस्टेंस फोर्सचे प्रमुख इस्रायली सरकारला गाझामध्ये अशा प्रकारच्या कारवाईला परवानगी देणार नाहीत. आमच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत आणि गाझाच्या लोकांविरोधात होणाऱ्या अन्यायावर आम्ही शांत राहू शकत नाही.

Israel Hamas War
Israel-Hamas War: इस्राइलशी लढायला हमासकडे इतका पैसा येतो कुठून? असं आहे जागतिक नेटवर्क

जो बायडन इस्राइलमध्ये दाखल

इस्त्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असून सगळ्या जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. यामध्ये अमेरिका इस्त्राइलच्या पाठिशी उभी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्राइलच्या बाजूने उघड भूमिका घेतली असून ते इस्राइलमध्ये दाखल झाले आहेत. इस्राइल दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी याबाबत आधीच माहिती दिली होती. भेटीदरम्यान बायडन हे इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत.

हमासला नष्ट करण्याचा इस्राइलचा निश्चय

इस्राइल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. दोघांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर प्रयत्न होत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र शांततेबाबत कोणतीही बोलणी सुरू नाही, असं इस्राइल आणि हमासकडून स्पष्ट करण्यात आलंय. आम्ही हमासला संपवू, मगच थांबू; असंही इस्त्राइलने स्पष्ट केलं आहे; दुसरीकडे हमासनेसुद्धा शांतता करार होणार नाही, असं जाहीर केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.