Israel Hamas War : हमास इस्त्राइल युद्धात आतापर्यंत ९००० हून अधिक मृत्यू; नेतन्याहू म्हणाले, हे दुसरं स्वतंत्र्ययुद्ध...

मागील काही दिवसांपासून इस्त्राइल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे.
benjamin netanyahu
benjamin netanyahusakal
Updated on

मागील तीन आठवड्यांपासून इस्त्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत ९००० लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे म्हटले आहे. हा टप्पा दिर्घकाळ चालणारा आणि कठिण असेल मात्र सेना मागे हटणार नाही, ही तर फक्त सुरुवात आहे असे म्हटले आहे.

शुक्रवारी गाझावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्याबद्दल बोलताना नेतन्याहू म्हणाले की, काल रात्री आमच्या सेनेा गाझामध्ये घुसले. हा या युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आहे. याचे उद्देश हमास सेना उद्धवस्त करणे आणि ओलीस ठेवण्यात आलेल्य नागरिकांना सुरक्षित परत घेऊन येणे हे आहे. आम्ही ग्राउंड ऑपरेशनचा विस्तार करण्याचा निर्णय वॉर कॅबिनेट आणि सेक्युरिटी कॅबिनेटच्या बैाठकीत सर्वसंमतीने घेतला आहे. आम्ही संतुलीत पद्धतीने हा निर्णय घेतला आहे.

नेतन्याहू म्हणाले की, आमचे कमांडर्स आणि जवान शत्रूंच्या प्रदेशात जावून लढत आहेत, त्यांना माहिती आहे की त्यांचं सरकार आणि जनता त्यांच्या सोबत आहे. मी आमच्या सैनिकांना भेटलो आहे. आमची सेना बेस्ट आहे, ज्यामध्ये एकापेक्षा एक शूर सैनिक आहेत. गाझावर इस्त्राइलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संध्या वाढून ७७०३ वर पोहचली आहे तर आतापर्यंत १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

benjamin netanyahu
Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स'मधील 'चँडलर बिंग' कालवश! अभिनेता मॅथ्यू पेरीचं निधन, राहत्या घरी आढळला मृतदेह

नेतन्याहू म्हणाले की गाझासोबतच युद्ध दिर्घकाळ आणि कठीण असणार आहे मात्र आम्ही त्यासाठी तयार आहोत. हे आमच्यासाठी दुसरे स्वातंत्र्ययुद्ध आहे . आम्ही आमची मातृभूमीचा रक्षा करण्यासाठी लढणार आहोत. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू आणि मागे हटणार नाहीत. आम्ही जमीन, समुद्र आणि हवा सर्व माध्यमातून लढू. आम्ही जमीनीवर आणि जमीनीच्या खाली देखील शत्रूंचा नाश करू असेही नेतन्याहू म्हणाले.

तसेच त्यांनी आपल्या संबोधनात सांगितले की हमासने ओलीस ठेवलेल्या २०० नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील असेही सांगितले.

benjamin netanyahu
Israel Vs Hamas: इस्राइलचे गाझावरचे हल्ले सुरूच; गाझा पट्टीची केली अक्षरशः चाळण

७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू

सात ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीवरून इस्त्राइलवर पाच हजारहून अधिक रॉकेट डागले होते. य़ा हल्ल्यानंतर इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास विरोधात युद्धाची घोषणा केली होती. या दोन आठवड्यांच्या युद्धात गाझा पट्टी पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे.

हमासच्या हल्ल्यात आजपर्यंत १४०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने २०० हून अधिक नागरिकांना ओलिस ठेवल आहे. हमासने दावा केला आहे की इस्त्राइलच्या बॉम्बहल्ल्यात ५० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात जीव गमावलेल्यांचा आकडा ९००० हून पुढे गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.