Israel-Hamas War : 13 इस्रायली ओलीसांची आज सुटका, आजपासून लागू होणार युद्धविराम

Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal
Updated on

गाझामध्ये सुरु असलेला हमास- इस्त्राइल संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. यादरम्यान इस्राइल आणि हमास यांच्यात युद्धविरामाचा करार झाला असून यानुसार शुक्रवारी दुपारी चार वाजता (स्थानिक वेळेनुसार) गाझामधून १३ ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या ओलिसांची सुटका केली जाईल त्यांच्या नावांची यादी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना देण्यात आली आहे. मानवतावादी आधारावर गाझामध्ये चार दिवसांची युद्धविराम शुक्रवारी सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी दोहामध्ये व्यापक बैठका आयोजित करण्यात आल्या. गाझामधील युद्धविराम शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल.

Israel-Hamas War
DK Shivakumar : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारने डीकेंविरोधातील CBI तपास केला रद्द

इस्त्रायली पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी इस्रायल आणि हमास यांच्यातील कतारच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाब्द्दल माहिती दिली आहे. तसेच सोडल्या जाणार्‍या ओलीसांची पहिली यादी मिळाल्याचे देखील सांगितले आहे. कार्यालयाने सांगितले की, इस्रायलला गाझामधून सोडण्यात येणार्‍या ओलीसांची प्राथमिक यादी मिळाली आहे, ज्यांना शुक्रवारी हमाससोबत युद्धविराम लागू झाल्यानंतर सोडली जाईल. तसेच संबंधित अधिकारी यादीतील तपशीलांची पडताळणी करत आहेत आणि सर्व पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

याआधी युद्धविराम करारांतर्गत हमास गुरुवारी ५० इस्रायली ओलीस सोडणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तजाची हानेग्बी यांनी नंतर एका निवेदनात सांगितले की, ओलीसांच्या सुटकेवर चर्चा सुरू आहे आणि कराराची अंमलबजावणी शुक्रवारपर्यंत लांबणीवर पडली आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांच्या बदल्यात इस्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुटकेची मागणी शेवटच्या क्षणी पूर्ण होऊ शकली नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे युद्धविराम एक दिवस लांबला. इस्राइलने दिलेल्या आकडेवारीनुसार, हमासने गाझामध्ये २३९ लोकांना ओलीस ठेवले आहे, ज्यात २६ देशांतील परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Israel-Hamas War
मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक केली. इस्रायली लष्कराने दिवसाला ३०० हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी इस्रायली लष्कराने हमास कमांडर अमर अबू जलालाला ठार केल्याचा दावा केला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की जल्लाल्ला खान हा युनिसमधील हमासच्या नौदलाचा कमांडर होता. हवाई हल्ल्यात अबू जलाला आणि हमासचा आणखी एक सैनिक ठार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.