Israel-Hamas War : ''अमानवी कृत्य थांबवा...'' इस्रायलला बराक ओबामांचा इशारा

Israel-Hamas War : ''अमानवी कृत्य थांबवा...'' इस्रायलला बराक ओबामांचा इशारा
Updated on

Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धाने सध्या अनेक देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अनेक देशांच्या प्रमुखांनी इस्रायलला भेटी दिल्या आहेत. मात्र युद्ध थांबायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी एक रॉकेट गाझा येथील हॉस्पिटलवर कोसळलं होतं. यामध्ये तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. हे रॉकेट नेमकं कुणाचं? याबाबत दोन्ही बाजूंकडून टोलवाटोलवी सुरु आहे.

हे भीषण युद्ध सुरु असताना बराक ओबामा यांनी मात्र इस्रायलला इशारा दिला आहे. गाझापट्टीमध्ये इस्रायलने ज्या पद्धतीने कारवाया सुरु केल्या आहेत, त्यामुळे भविष्यात त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील. गाझा पट्टीमध्ये अन्न आणि पाण्याचा पुरवठा इस्रायलने खंडीत केला आहे. तसेच वीजपुरवठादेखील बंद केलाय. त्यामुळे बराक ओबामा यांनी इस्रायलला इशारा दिला.

Israel-Hamas War : ''अमानवी कृत्य थांबवा...'' इस्रायलला बराक ओबामांचा इशारा
Pak Vs Afg : तालिबानला सहन होईना पाकिस्तानचा पराभव, विजय साजरा करणाऱ्या अफगाणी नागरिकांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

''इस्रायलच्या कारवायांमुळे त्यांना मिळणारा आंतरराष्ट्रीय पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे. मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचं दूरगामी परिणाम भोगावे लागतील. अन्न, पाणी, वीज आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबवणं अमानवी असून पॅलेस्टिनी नागरिकांचा इस्रयलकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरुन त्यांना समर्थन मिळणार नाही'' असं बराक ओबामा म्हणाले.

Israel-Hamas War : ''अमानवी कृत्य थांबवा...'' इस्रायलला बराक ओबामांचा इशारा
Israel Hamas War : हमासकडून दोन इस्रायली महिलांची सुटका; अमेरिकेचा इस्त्राइलला महत्वाचा सल्ला

दरम्यान, इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी दावा केला की, हमासच्या ज्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. त्यांना केमिकल हत्यारं बनवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

तसेच सैन्याच्या माहितीनुसार, किबुत्जच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये कत्तली करणाऱ्या काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांचे मृतदेह जेव्हा बारकाईनं तपासण्यात आले तेव्हा त्यांच्याजवळून केमिकल हत्यारं बनवण्याचं सामान आढळून आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.