Israel-Hamas War: इस्राइलच्या पंतप्रधानांची हिजबुल्लाला धमकी, 'युद्धात पडू नका अन्यथा लेबनॉनचे...'

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

तेल अवीव- इस्राइल आणि हमासच्या अतिरेक्यांमध्ये युद्ध सुरु आहे. ७ ऑक्टोंबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्राइलवर जमीन आणि हवेतून हल्ला केला. त्यामुळे युद्धाला तोंड फु़टले. इस्राइलने प्रतिहल्ला सुरु केला असून जोरदार उत्तर दिले जात आहे. त्यातच लेबनॉनमधील हिजबुल्ला अतिरेकी संघटनेने कुरापत सुरु केली आहे.यावर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हिजबुल्ला संघटनेला गंभीर इशारा दिला आहे.

हमासच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी इस्राइलच्या सीमेवर काही रॉकेट डागले होते. तसेच सीमेवर चकमकी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू म्हणालेत की, 'इस्राइलसोबत हिजबुल्लाने युद्ध घोषित केले तर कधी कल्पनाही केली नसेल असा विध्वंस लेबनॉनमध्ये घडवला जाईल.' (Israel Hamas War The Israeli premier Benjamin Netanyahu warns Hezbollah Do not enter war or Lebanon)

Israel-Hamas War
Irfan Pathan : इरफान पठाणनं इस्त्राइल - हमास युद्धावर केलं ट्विट; कोणाची घेतली बाजू?

हमास-इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिजबुल्ला युद्धामध्ये उडी घेण्याची शक्यता आहे. यावर इस्राइलचे प्रमुख नेतान्याहू म्हणाले की, 'हिजबुल्ला पूर्णपणे युद्धामध्ये उतरेल याबाबत सांगता येत नाही.' लेबनॉनमध्ये हिजबुल्ला दहशतादी संघटना कार्यरत आहे. हिजबुल्लाने दुसऱ्या बाजूने हल्ला चढवल्यास इस्राइलच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इस्राइलच्या म्हणण्यानुसार, 'पुन्हा एकदा लेबनॉनमधून रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. हे हल्ले ड्रोन द्वारे हाणून पाडण्यात आले आहेत. हिजबुल्ला खूप गंभीर खेळ खेळत आहे.लेबनॉनच्या सीमेवरुन ६० हजार इस्राइली नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लेबनॉनला युद्धात ओढल्याने काहीही साध्य होणार नाही, केवळ नुकसानच होईल.'

Israel-Hamas War
Israel Hamas War : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, दोघेही लोकशाहीचे शत्रू...

दरम्यान, गाझा पट्टीतील मृत्यूंची संख्या ४७४१ इतकी झाली आहे. पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १६ हजारांच्या जवळपास लोक जखमी झाले आहेत. इस्राइलचा गाझा पट्टीत विध्वंस सुरु आहे. नागरिकांना दक्षिण भागात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी दक्षिण भागातही इस्राइलचे हल्ले सुरुच आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.