Israel-Hamas war news : सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे ५७ मुस्लिम देशांच्या इस्लामिक अरब समिटची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये इस्राइलविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यासंदर्भात सहमती झालेली नाही. केवळ औपचारिक भाषणबाजीने बैठकीची सांगता झाली.
गाझामध्ये इस्राइलने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली होती. यामध्ये पाकिस्तान आणि तुर्कीसह काही देशांनी युद्धबंदीची मागणी केली होती. अल्जेरिया आणि लेबनॉन यांसारख्या देशानांनी इस्राइलला होणारा तेलपुरवठा थांबवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु याही बाबतीत या बैठकीमध्ये सहमती झालेली नाही.
इस्राइलचे हल्ले असेच सुरु राहिले तर त्याचा थेट परिणाम इतर देशांना भोगावा लागेल. आतापर्यंत या युद्धामध्ये १२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. परंतु इस्राइलकडून हल्ल्यांचं समर्थन होत असून स्वसंरक्षणार्थ प्रतिकार करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे; हे समर्थन चुकीचं असल्याचं बैठकीमध्ये मांडण्यात आलं.
दरम्यान, बैठकीमध्ये बहारीन आणि यूएईने मांडलेल्या प्रस्तावांवर आक्षेप नोंदवून इतरांनी आपली बाजू मांडली. त्यामुळे तेलबंदीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. बहरीन आणि UAE ने 2020 मध्ये इस्रायलशी संबंध सुधारले होते. त्यातूनच एक करार झाला होता.
बैठकीनंतरी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद म्हणाले की, बैठकीत कोणताही ठोस प्रस्ताव मांडता आला नाही, संघटना अशक्त असल्याचं हे प्रतिक आहे. मध्यपूर्वेतील देशांनी इस्रायलशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, तरच नरसंहार रोखला जाईल. मात्र ५७ देशांच्या बैठकीमध्ये इस्राइलविरोधात कोणतीही ठोस अॅक्शन घेण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.