Israel Attack On Lebanon: इस्राईलने 10 दिवसांत मोडलं हिजबुल्लाचं कंबरडं; जाणून घ्या आत्तापर्यंत कधी काय झालं?

Israel Lebanon Border Clashes Latest Updates : मध्य पूर्वेत मागील काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर बनली आहे.
Israel Attack On Lebanon
Israel Attack On LebanonEsakal
Updated on

Global News Updates in Marathi: मध्य पूर्वेत मागील काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर बनली आहे. हिज्बुल्ला प्रमुख हसन नसरल्लाहचा इस्त्राईलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या भागातील तणाव प्रचंड वाडला आहे. येथे मोठ्या प्रमाणात युद्द पेटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या युद्धात नेमकं काय घडलं? याचा आढावा आपण घेणार आहोत.

  • १७-१८ सप्टेंबर - लेबनॉनमध्ये हिज्बुल्ला मेंबर्सच्या पेजर आणि वॉकी-टॉकीचे स्फोट झाले. या हल्ल्यासाठी हिज्बुल्लने इस्त्राईलवर आरोप केले. मात्र इस्त्राईलने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली नाही.

  • २० सप्टेंबर - इस्त्राईलने दक्षिण बैरूत मध्ये हिज्बुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला. मीडिया रिपोर्टनुसार हल्ल्यात हिज्बुल्लाच्या एका टॉप कमांडरसह ५५ लोक ठार झाले.

  • २३ सप्टेंबर - इस्त्राईलने लेबनॉनवर बॉम्बफेक केली, ज्यामध्ये १३०० ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आले. एकाच दिवसात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. ही इस्त्राईलच्या सर्वात मोठ्या मिलिट्री कारवायांपैकी एक होती.

  • २५-२६ सप्टेंबर - लेबनॉनमध्ये इस्त्राईलकडून लागोपाठ हल्ले सुरू असतानाच हिज्बुल्लाकडून प्रत्त्युत्तर देण्यासाठी हल्ले करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिखर सम्मेलनात जागतीक नेत्यांनी तणाव कमी करण्यासाठी आवाहन केले. अमेरिका आणि सहकारी राष्ट्रांनी २१ दिवस युद्धविरामाचे आवाहन केले. मात्र इस्त्राईलने ही विनंती फेटाळून लावली. मीडिया रिपोर्ट्सनुसार हिज्बुल्लाने देखील असे करण्यास नकार दिला.

Israel Attack On Lebanon
Israel Attacks Lebanon : हिज्बुल्लाला आणखी एक दणका; इस्राईलच्या माऱ्यात केंद्रीय समितीचा उपप्रमुख ठार
  • २७ सप्टेंबर - इस्त्राईलचे पीएम बेंजमिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांना संबोधित करत हिज्बुल्लाला हरवण्याबद्दल भाष्य केले. यानंतर त्याच दिवशी त्यांनी बैरूतमध्ये हिज्बुल्लाच्या हेडक्वार्टरवर हल्ला करण्याचा आदेश दिला. या हल्ल्याचे खरे टार्गेट हिज्बुल्ला चीफ हसन नसरलल्लाह होता. इस्त्राईली डिफेंस फोर्सेस (आयडीएफ)ने शुक्रवारी रात्री बैरुतच्या दक्षिण उपनगरीय भागात दहिह मध्ये हिज्बुल्ला हेडक्वार्टरवर हल्ला केला, ज्यामध्ये नसरल्लाह याचा मृत्यू झाला.

  • २८ सप्टेंबर - शनिवारी आयडीएफने नसरल्लाह याला ठार केल्याची घोषणा केली, यानंतर काही तासातच हिज्बुल्लाने देखील आपल्या नेत्याच्या मृत्यूला दुजोरा दिला. नसरल्लाह हा वयाच्या ३०व्या वर्षी १९९२ मध्ये हिज्बुल्लाचा चीफ बनला होता. मागील ३२ वर्षांमध्ये त्याने हिज्बुल्लाला लेबनॉनसोबतच मध्य पूर्वेत मोठी ताकद मिळवून दिली. तो इस्त्राइलचा एक नंबरचा शत्रू होता.

Israel Attack On Lebanon
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्राईलने लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाच्या ठिकाणावर बॉम्बहल्ले करत आहे. यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी इराण काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे, इराणकडून हमास आणि हिज्बुल्ला दोन्हीचे समर्थन केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.