Lakshadweep: भारताचा मित्र इस्राइलने मालदीवला दाखवला आरसा; लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांना मिरची लागली होती. या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मालदीव सरकारने यावर कारवाई केली असली तरी दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
Lakshadweep
Lakshadweep
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांना मिरची लागली होती. या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मालदीव सरकारने यावर कारवाई केली असली तरी दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच भारताचा मित्र असलेल्या इस्राइलने मालदीवला आरसा दाखवत लक्षद्वीवपच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. (Israel in India comment on maldives and lakshadweep ready to commence working on desalination program)

इस्राइलकडून यांसदर्भात अधिकृतरित्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. इस्राइलने घोषणा केलीये की, उद्यापासूनच म्हणजे मंगळवारपासूनच केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपच्या समुद्राचे पाणी साफ करण्याचा प्रोजेक्ट हाती घेण्यात येणार आहे. भारत आणि मालदीवमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्राइलचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.

Lakshadweep
Boycott Maldives: बॉयकॉट मालदीव चलो लक्षद्वीप! अक्षय, सलमानपासून जॉन, श्रद्धापर्यंत 'या' सेलिब्रिटींनी दिला नारा...

भारतातील इस्राइली दूतावासाने आपल्या एक्स हँडलवर लक्षद्वीपचे काही सुंदर फोटो शेअर केलेत. त्यात लिहिलंय की, डिसेलिनेशन प्रोजक्ट सुरु करण्याच्या भारताच्या विनंतीनंतर आम्ही लक्षद्वीपला भेट दिली होती. इस्राइल उद्यापासूनच या प्रोजक्टवर काम करण्यास तयार आहे. ज्यांनी लक्षद्वीपची सुंदरता पाहिली नाही त्यांच्यासाठी आम्ही काही फोटो शेअर करत आहोत. या फोटोमधून मनमोहक आणि आकर्षत लक्षद्वीप तुम्हाला पाहायला मिळेल.

डिसेलिनेशन काय आहे?

लक्षद्वीप हा बेटांचा समूह आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असते. इस्राइलकडे खारट पाण्याला गोड पाण्यामध्ये बदलण्याचे तंत्रज्ञान आहे. याला डिसेलिनेशन (desalination program) असं म्हटलं जातं. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्यातील अशुद्ध घटक आणि खनिजे वेगळे केले जातात. इस्राइल सारख्या समूद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या देशासाठी हे तंत्रज्ञान खूप महत्वाचं ठरलं आहे. आता याचा वापर लक्षद्वीपमध्ये देखील केला जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.