Israel Iron Dome : इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या

Israel War : शनिवारी गाझा पट्टीतून इस्राइलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला केला गेला.
Israel Iron Dome
Israel Iron Dome
Updated on

शनिवारी (7 ऑक्टोबर) गाझा पट्टीतून इस्राइलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला केला गेला. तब्बल 5,000 मिसाईल्स इस्राइलच्या प्रमुख शहरांमध्ये येऊन पडल्या. देशाच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचं हे मोठं अपयश मानलं जातंय.

जगातील सर्वात प्रभावी हवाई सुरक्षा प्रणाली मानली जाणारी आयर्न डोम टेक्नॉलॉजी देखील इस्राइलकडे होती. मात्र, त्याला भेदण्यात हमासच्या दहशतवाद्यांना यश आलं आहे. ही टेक्नॉलॉजी काय होती, आणि ती कशामुळे फेल झाली? जाणून घेऊया.

Israel Iron Dome
Israel Palestine Conflict : लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना मागे कोसळलं इस्त्रायली क्षेपणास्त्र; व्हिडिओ होतोय व्हायरल

आयर्न डोम

इस्राइलने 2006 च्या लेबनन संघर्षानंतर आयर्न डोम टेक्नॉलॉजी विकसित केली होती. या संघर्षावेळी इस्राइलच्या उत्तरी भागात मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला होता. यानंतर इस्राइलने आपली हवाई सुरक्षा प्रणाली अपडेट केली होती.

ही प्रणाली म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. हवेतून येणाऱ्या मिसाईल्सना हवेतच उद्धवस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे. रॉकेट, मोर्टर, टॉप शेल अशा कोणत्याही हल्ल्याला परतवून लावण्याची यात क्षमता आहे. देशाच्या चारही बाजूंनी, विविध ठिकाणी ही प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे.

Israel Iron Dome
Israel War: इस्त्राइलमध्ये परिस्थिती गंभीर! 500 हून अधिक बळी, कित्येक नागरिक बेघर... आतापर्यंत काय घडलं?

इस्राइलच्या भोवती 70 किलोमीटर अंतराचा भाग ही प्रणाली कव्हर करते. या सीमेमध्ये कोणतीही मिसाईल, ड्रोन वा हल्ला करणारी एखादी गोष्ट येते; तेव्हा आयर्न डोम सिस्टीम आपोआप सुरू होते आणि या गोष्टीला हवेतच नष्ट करून टाकते. यामुळेच इस्राइलचे शेजारी राष्ट्र देशाच्या सीमेजवळून जाण्याचाही प्रयत्न करत नाहीत.

यावेळी कशामुळे फेल?

हमास दहशतवादी संघटनेने काही मिनिटांमध्येच तब्बल 5,000 रॉकेटने इस्राइलवर हल्ला केला. यामुळे इस्राइलच्या आयर्न डोम टेक्नॉलॉजीवर बराच ताण आला. त्यातही हमासने 'सॉल्व्ह रॉकेट'चा वापर केला होता. हे रॉकेट एकाच वेळी कित्येक लाँचर्सना फायर करतं.

Israel Iron Dome
Israel Rocket Attack: इस्त्रायलवर 2 तासांत 5 हजार रॉकेट हल्ले करणारी हमास संघटना काय आहे?

आयर्न डोम प्रणाली यातील ठराविक रॉकेटनाच उद्धवस्त करू शकते. त्यामुळे यावेळी ही प्रणाली फेल झाल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात, इस्राइलमधील मृतांची संख्या पाहता आयर्न डोमने कित्येक नागरिकांची रक्षा केल्याचं स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.