Israel Lebanon War: इस्राईल हल्ल्याच्या भीतीने दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा

सोमवारी इस्राईलने दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी निघून जाण्याचा इशारा दिला आणि काही तासांतच सुमारे सोळाशे ठिकाणी तुफान बाँबवर्षाव केला. यामध्ये हिज्बुल्लाचे अनेक दहशतवाद्यांबरोबरच सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.
Israel Lebanon War: इस्राईल हल्ल्याच्या भीतीने दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
Updated on

बैरूत: लेबनॉनवर सोमवारी तुफान बाँबफेक केल्यानंतर मंगळवारी इस्राईल आणि हिज्बुल्ला यांनी परस्परांवर मारा केला. इस्राईलच्या हल्ल्यांच्या भीतीने दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित झाले असून महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, इस्राईलने केलेल्या बाँबवर्षावात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५५८ झाली असून यामध्ये ५० बालके आणि ९४ महिलांचा समावेश असल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिले.

लेबनॉन आणि सीरिया या दोन देशांमध्ये आश्रय घेत हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना इस्रायली नागरिकांवर हल्ले करत असल्याचा इस्राईलचा आरोप आहे. गाझा पट्टीतील युद्धापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवरही गोळीबार आणि रॉकेट हल्ले सुरू होते. मात्र, गाझा पट्टीत हमासला खिळखिळे करणाऱ्या इस्राईलने मागील काही आठवड्यांपासून हिज्बुल्लाला लक्ष्य करत त्यांच्या काही म्होरक्यांना ठार मारले होते.

सोमवारी इस्राईलने दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी निघून जाण्याचा इशारा दिला आणि काही तासांतच सुमारे सोळाशे ठिकाणी तुफान बाँबवर्षाव केला. यामध्ये हिज्बुल्लाचे अनेक दहशतवाद्यांबरोबरच सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५८० जणांचा मृत्यू झाला असून १,८३५ जण जखमी झाले आहेत. या मोठ्या हल्ल्यानंतरही दोन्ही बाजूंकडून सीमेवर हल्ले सुरू आहेत. हिज्बुल्लाने मंगळवारी उत्तर इस्राईलवर ५५ रॉकेटद्वारे मारा केला. यामुळे काही इमारतींना आग लागली, तर काही इमारतींचे नुकसान झाले.

Israel Lebanon War: इस्राईल हल्ल्याच्या भीतीने दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
Elon Musk Mars Mission : इलॉन मस्कनी सांगितलं मंगळावर कधी पाठवणार माणूस,अंतराळातही सुरू करणार पोर्टल

शस्त्रसाठे निशाण्यावर

हिज्बुल्लाच्या शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ते नष्ट करून त्यांची हल्ला करण्याची क्षमताच कमी करण्यावर इस्राईलने भर दिला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरपासून हिज्बुल्लाने इस्राईलवर सुमारे ९०० रॉकेटचा मारा केल्याचा इस्राईलचा दावा आहे. त्यांच्या लढाऊ विमानांनी सोमवारी दक्षिण लेबनॉनमधील हिज्बुल्लाशी संबंधित १६०० ठिकाणांना लक्ष्य करत बाँबवर्षाव केला. या हल्ल्यात हिज्बुल्लाकडील क्रूझ क्षेपणास्त्रे, दीर्घ आणि लघु पल्ल्याची रॉकेट, ड्रोन असा शस्त्रसाठा नष्ट केला. शस्त्रांचा हा साठा घरांमध्ये करून ठेवण्यात आला होता, असे इस्राईलने सांगितले. हिज्बुल्लाकडे दीड लाख रॉकेट आणि क्षेपणास्त्रे असल्याचा इस्राईलचा दावा आहे.

हजारो जण विस्थापित

मोठा हल्ला करणार असल्याने निघून जावे, असा इशारा इस्राईलने दिल्यानंतरही दक्षिण लेबनॉनमधील अनेक नागरिकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र, हल्ले सुरू झाल्यावर हाती लागेल ते सामान घेत हजारो नागरिकांनी देशाच्या उत्तर दिशेकडे जाण्यास सुरुवात केली आहे. केवळ हिज्बुल्लाच्या ठिकाणांना आणि शस्त्रसाठ्यांना लक्ष्य करत हल्ले केल्याचा दावा इस्राईलने केला असला तरी त्यांनी टाकलेले अनेक बाँब निवासी भागांवर पडले. लेबनॉनमधील अनेक नागरिक सीरियामध्येही जाण्याचा प्रयत्न करत असल्याने या सीमेवरही कोंडी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.