Israel-Hamas War : इस्राइल देणार एक लाख भारतीय बांधकाम कामगारांना नोकरी; पॅलेस्टिनी कामगारांच्या जागा भरणार - रिपोर्ट

7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर देशातील सुमारे 90 हजार पॅलेस्टिनी कामगारांचे परवाने रद्द केले आहेत.
Israel-Hamas War
Israel-Hamas WareSakal
Updated on

इस्राइल-हमास युद्धाचे मोठे पडसाद जगभरात दिसून येत आहेत. इस्राइलमधील बांधकाम उद्योगावर देखील याचा परिणाम दिसत आहे. 7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर देशातील सुमारे 90 हजार पॅलेस्टिनी कामगारांचे परवाने रद्द केले आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी एक लाख भारतीय कामगारांना भरती करण्याची मागणी इस्राइलच्या बांधकाम उद्योगाने तेल अवीव सरकारला केली आहे.

टेलिग्राफने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इस्राइल बिल्डर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष हाईम फेईग्लिन म्हणतात, "सध्या आम्ही भारतासोबत बोलणी करत आहोत. तसंच, इस्राइल सरकारकडून परवानगी मिळण्याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. संपूर्ण बांधकाम क्षेत्र पूर्वपदावर आणण्यासाठी आम्हाला भारताकडून 50 हजार ते एक लाख कामगार मिळण्याची अपेक्षा आहे."

Israel-Hamas War
Israel-Hamas War: गाझाचे दोन तुकडे, इस्राइली लष्कराने तयार केला मास्टर प्लॅन; विनाश आणखी वाढणार?

"इस्राइलमधील 25 टक्के ह्यूमन रिसोर्स कामगार हे पॅलेस्टाईनमधून येतात. यातील 10 टक्के गाझा पट्टीतील आहेत. 7 ऑक्टोबरनंतर सुरू झालेल्या युद्धामुळे आता या कामगारांना इस्राइलमध्ये काम करण्याची परवानगी नाही. यामुळे या क्षेत्रात भरपूर कामगारांची गरज आहे."

अद्याप इस्राइल-पॅलेस्टाईन मधून भारतीयांना मायदेशी आणणारे 'ऑपरेशन अजय' संपलेले नाही. यातच इस्राइलमध्ये भारतीय कामगारांना पाठवण्यासाठी सरकार तयार होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()