Pager blasts across Lebanon
नवी दिल्ली- लेबनॉन देश मंगळवारी हादरला. अचानक अनेक लोकांच्या पेजर्समध्ये स्फोट झाला. यात नऊ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर अडीच हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे इस्त्राईलच्या मोसादचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका रिपोर्टमध्ये या संदर्भात महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.
इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादने तैवान-मेड ५००० पेजर्समध्ये छोट्या प्रमाणात स्फोटकं ठेवली होती. याच स्फोटकांचा मंगळवारी स्फोट झाला असं लेबनॉनच्या सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.