Israel News: सायकल चालवताना भीषण अपघात, चिमुकल्याचं शीर धडावेगळं! डॉक्टरांनी घडवला चमत्कार

अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात डॉक्टरांनी जबरदस्त कामगिरी केली आहे.
Cycling
Cycling
Updated on

Israel News: सायकल चालवताना अचानक झालेल्या एका भीषण अपघातात एका १२ वर्षीय मुलाचं शीर धडावेगळं झालं. पण हेच शीर पुन्हा धडाला जोडून त्या मुलाचे प्राण वाचवण्याचा चमत्कार घडला आहे. डॉक्टरांनी हा चमत्कार घडवून आणला आहे. (Israel News child head almost detached by his body while riding bicycle Doctor did miracle)

Cycling
Video : अजित पवारांनी घेतला 'वंदे भारत'चा फील; नाशिकमध्ये करणार शक्तिप्रदर्शन

इस्रायलमध्ये सुलेमान हसन (वय १२) या पॅलेस्टिनी मुलाबाबत ही घटना घडली आहे. सायकल चालवताना त्याचा भीषण अपघात झाला. एका कारनं धडक दिल्यानं त्याचं शीर हे धडापासून जवळपास वेगळंच झालं होतं, केवळ काही नसांच्या माध्यमातून ते जोडलेलं होतं. पण मनक्यासह त्याचे मज्जारज्जू देखील वेगळे झाल्याचं इस्रायलमधील एका दैनिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Cycling
PM Modi France Visit : पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यामधून देशाला काय मिळालं? पाहा ठळक मुद्दे

दरम्यान, या भीषण अपघातात मुलाची प्रकृती नाजूक असल्यानं त्याला एअर अँब्युलन्सनं हादासाह मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे आर्थोपिडिक डॉक्टर ओहद इनाव यांनी ही खूपच जटील शस्त्रक्रिया असल्याचं म्हटलं आहे, तसेच या कामासाठी त्यांना अनेक तास लागले.

Cycling
Share Market Investment: 6 वर्षात 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

डॉक्टरांनी सांगितलं की, अशा पद्धतीच्या दुर्मिळ घटनेत केवळ त्वचेमुळंचं या मुलाचं शीर चिकटून होतं. पण आम्ही आमचं सर्व कौशल्य पणाला लावलं आणि अखेर विजय मिळवला. या मुलाचं डोक आणि धड यांना जोडून ठेवण्यासाठी त्यामध्ये धातुच्या प्लेट्स लावण्यात आल्या आणि पुढे जटील पद्धतीनं शस्त्रक्रिया झाली. काही दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर आता या मुलाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Cycling
Atul Parchure Cancer: लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांना कॅन्सर, लग्नाच्या 25 व्या वाढदिवशीच..

या मुलावर सर्जरी यशस्वी झालेली असली तरी अजूनही तो वैद्यकीय निरिक्षणाखाली आहे. पण अशा प्रकरच्या केसमध्ये शस्त्रक्रिया तेव्हाच शक्य असते जेव्हा रक्त्याच्या नस शाबूत असतात. कारण मेंदूमध्ये रक्ताचा प्रवाह सुरु राहणं गरजेचं आहे. या मुलाच्या बाबतीत हीच जमेची बाजू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.