Israel-Palestine Conflict: गाझामध्ये घुसण्याचा इस्राईलचा इशारा

Israel-Palestine Conflict: गाझामध्ये घुसण्याचा इस्राईलचा इशारा
Updated on

जेरुसलेम : इस्राईल आणि पॅलेस्टाइन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला असून हमास (Hamas) ही दहशतवादी संघटना ज्या भागातून अविरत रॉकेट हल्ले करत आहे, त्या गाझा पट्टीत घुसण्याचा इशारा इस्राईलने दिला आहे. इस्राईलने केवळ इशाराच दिला नसून सीमेवर त्यांनी मोठे सैन्य आणि रणगाडे तैनात केले आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी इजिप्तच्या मध्यस्थांनी इस्राईलमध्ये धाव घेतली असली तरी शांतता निर्माण करण्यात त्यांना यश आलेले नाही. गाझा पट्टीतील (Gaza) संघर्षामुळे इस्राईलमध्ये देशांतर्गतही ज्यू आणि अरब (Arabs, Jews) यांच्यात संघर्ष पेटला आहे. लोड या गावात दोन्ही समुदाय पोलिसांना न जुमानता एकमेकांवर चालून जात आहेत. त्यामुळे इस्राईलमधील राजकीयदृष्ट्या अस्थिर सरकारला दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. मात्र, ७० वर्षांपासून सुरु असलेल्या या वादात मागे हटण्यास कोणीही तयार नाही. याशिवाय, काल रात्री लेबनॉनमधूनही एक रॉकेट इस्राईलच्या दिशेने डागले गेले. त्यामुळे नव्या आघाडीवरही युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Israel Palestine Conflict Israel warns of infiltration into Gaza)

Israel-Palestine Conflict: गाझामध्ये घुसण्याचा इस्राईलचा इशारा
इस्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष नेमका काय आहे?

काय आहे हा संघर्ष?

पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचाही जेरुसलेम या शहरावर दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून याबाबत संघर्ष सुरु आहे. याबाबत पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन करणाऱ्या हमासने इस्त्रायलवर रॉकेट्स डागले आहेत. हमासने याआधीच इशारा दिला होता की, आंदोलकांच्या विरोधात सुरु असणाऱ्या इस्त्रायली कारवाईबाबत हमासकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल.

इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता पण बहुतांश देशांना हे कृत्य अमान्य होतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. पूर्व जेरुसलेमवर हक्क सांगणारे ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हुसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे. इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती, पण हिंसाचारांच्या घटनांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

पॅलेस्टाईनमधील लोकांना असं वाटतं की एकदा का त्यांचा देश स्वतंत्र झाला की पूर्व जेरूसलेम त्यांच्या देशाची राजधानी बनेल. पूर्व जेरूसलेममधील शेख जर्रा इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे पॅलेस्टाईनचं म्हणणे आहे. त्यावरून हा सगळा वाद सुरू आहे.

हमास काय आहे? आणि या सगळ्यात तिचा रोल काय आहे?

हमास ही एक पॅलेस्टाईन राजकीय मते असणारी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी 1987 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच इस्रायलच्याविरोधात युद्ध पुकारलं आहे. हमास इस्रायलवर सातत्याने रॉकेटद्वारे हल्ले करुन निशाणा साधतो. इस्रायलला एक पॅलेस्टाईन राज्य बनवायची हमासची इच्छा आहे. या दहशतवादी संघटनेच्या ध्येयधोरणामध्येच इस्त्रायला उद्धवस्त करण्याचा उद्देश लिहला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.