Israel Palestine Conflict : अमेरिका इस्त्राइलसोबत...; हमासच्या हल्ल्यानंतर बायडन यांनी जाहीर केला पाठिंबा

हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्णाण झाली आहे.
Israel Palestine Conflict us stands with israel says joe biden hamas attack on Israel
Israel Palestine Conflict us stands with israel says joe biden hamas attack on Israel
Updated on

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी हमासकडून दहशतवादी हल्ल्यादरम्यान अमेरिका इस्त्राइलच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यामध्ये आज इस्त्राइलच्या नागरिकांवर दहशतवादी संघटना हमासद्वारे हल्ला करण्यात येत आहे.

या संकटाच्या काळात मी त्यांना आणि जगातील सर्व दहशतवादी संघटनांना सांगू इच्छितो की अमेरिका इस्त्राइलसोबत आहे आणि त्यांची मदत करण्याबाबत मागे हटणार नाही. त्यांना हवी ती मदत मिळेल, याची आम्ही काळजी घेऊ जेणेकरून ते स्वतःचं रक्षण करू शकतील, असेही बायडन म्हणाले आहेत.

इस्त्राइल आणि गाझा या भागात शनिवारी मोठा संघर्ष पेटला आहे. दहशतवादी गट हमासने दक्षिण आणि मध्य इस्त्राइलवर हजारो क्षेपणास्त्र डागले. टाइम्स ऑफ इस्त्राइलने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माहिती दिली की या हल्ल्यात २००हून अधिक लोक ठार झाले आहेत. तसेच ११०४ लोक जखमी झाले आहेत. तसेच गाझामध्ये अनेक इस्त्राइली नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.

Israel Palestine Conflict us stands with israel says joe biden hamas attack on Israel
Israel Palestine Conflict : लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना मागे कोसळलं इस्त्रायली क्षेपणास्त्र; व्हिडिओ होतोय व्हायरल

बायडन यांनी सांगितलं की, जगाने भयानक चित्र पाहिलं आहे, काही तासांत हजारो रॉकेट्स इस्त्रायली शहरांवर डागण्यात आले. तसेच इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी संवाद झाल्याचं देखील बायडन यांनी सांगितेलं. आम्ही इस्त्राइलच्या जनतेसोबत असून त्यांना आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. दहशतवीदी हल्ला सांगून होत नाही, इस्त्राइलच्या सुरक्षेसाठी आमचा दृढ पाठिंबा आहे असेही बायडन म्हणाले.

बायडन यांनी त्यांच्या टीमला इजिप्त, तुर्की, सौदी अरेबिया, ओमान, जॉर्डन, युएई सोबत युरोपातील मित्र राष्टांसह पॅलेस्टाइन प्राधिकरणाच्या नेत्यांच्या संपर्कात राहाण्याचे निर्देष दिले आहेत.

Israel Palestine Conflict us stands with israel says joe biden hamas attack on Israel
Israel-Gaza Conflict: इस्रायल आणि गाझा यांच्यातला वाद नक्की काय आहे ? त्याचा इतिहास काय आहे ?

तसेच बायडेन यांनी जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त केली, सोबतच त्यांनी आम्ही पंतप्रधानांच्या कायम संपर्कात राहू, मी वयक्तिकरित्या प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या संपर्कात राहणार आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका, दिर्घकाळापासून अमेरिका इस्त्राइल सोबत आहे. अमेरिका ७५ वर्षांपूर्वी स्थापनेच्या ११ मिनीटांनंतर इस्त्राइलला मान्याता देणारा पहिला देश बनला होता, असेही बायडन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.