Israel-Hamas War: गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित

Israel-Hamas War: गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित
Updated on

तेल अविव- इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सांस्कृतिक वारसा मंत्री अमिचाई ईलियाहू ( Amichai Eliyahu) यांना सरकारमधून निलंबित केले आहे.अमिचाई ईलियाहू यांनी गाझावरील हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गाझावर आण्विक हल्ला करण्याचा आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चौहूबाजूंनी टीका होऊ लागली होती.

नेतान्याहू यांनी अमिचाई ईलियाहू यांच्या कट्टर जहाल वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तसेच मंत्र्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नेतान्याहू म्हणाले की, इस्राइलचे लष्कर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आहे. त्यानुसार निष्पाप नागरिकांना कोणतीही हानी करण्यात येणार नाही. (Israel Prime Minister Benjamin Netanyahu has suspended Heritage Minister Amichai Eliyahu from government)

Israel-Hamas War: गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित
Sakal Podcast: मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत ते गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद

पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, मंत्री अमिचाई ईलियाहू यांचे वक्तव्य सत्याला धरुन नाही. इस्राइल आणि आयडीएफ आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत आहेत. कोणत्याही निष्पाप नागरिकांना त्रास होईल असं काही केलं जाणार नाही. आमच्या विजयापर्यंत आम्ही याच मार्गाने पुढे जात राहू.

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोंबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. माहितीनुसार, या हल्ल्यामुळे इस्राइलचे लष्करी सैन्यासह १४०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे गाझामधील मृत्यूची संख्या मोठी आहे. गाझामध्ये आतापर्यंत ९४८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं.

Israel-Hamas War: गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित
Israel-Hamas War : पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्सचा धुमाकूळ; भारतासह कित्येक इस्राइल समर्थक देशांवर सायबर हल्ले वाढले

एका रेडियो मुलाखतीत ईलियाहू यांना विचारण्यात आलं होतं की, गाझामध्ये नरसंहार करण्यासाठी एक प्रकारचा आण्विक हल्ला करण्यात येईल का? यावर उत्तर देताना ते म्हणाले होते, हा एक पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर ईलियाहू यांनी आपल्या वक्तव्यापासून माघार घेतली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.