Israel Rocket Attack: तीन इस्रायली रॉकेट शाळेवर पडले अन् गाझात 100 लोकांनी गमावला जीव

Gaza School: शाळेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये मोठी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत अडकलेल्या पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.
Esakal
Israel Rocket Attack On SchoolIsrael Rocket Attack On School
Updated on

गाझा येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. हा हल्ला इस्रायलने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेत विस्थापित निर्वासितांनी आश्रय घेतला होता.

गाझाच्या संरक्षण संस्थेने दावा केला आहे की, शनिवारी सकाळी गाझा येथील एका शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले आहेत.

"मृतांची संख्या 90 ते 100 च्या दरम्यान आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. तीन इस्रायली रॉकेट एका शाळेवर पडले जेथे विस्थापित पॅलेस्टिनी राहत होते," असे एजन्सीचे प्रवक्ते महमूद बसल यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.

शाळेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये मोठी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत अडकलेल्या पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.

या हल्ल्याबाबत सांगताना एजन्सी म्हणाली की, "हल्ल्यादरम्यान काही लोक जिवंत जळाले."

यापूर्वी गुरुवारी इस्रायली सैन्याने गाझामधील दोन शाळांवर हल्ला केल्यानंतर किमान 18 लोक ठार झाले होते. त्यावेळी इस्रायली लष्कराने हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला केल्याचे सांगितले होते.

Esakal
Russia-Ukraine War : युक्रेनला रोखण्यासाठी रशियाचा लढा सुरूच

इस्रायलवर हल्ल्याचे आदेश

दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सुरक्षा दलांना इस्रायलवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करून हमासचे माजी प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येचा बदला घेण्यास सांगितले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे उपप्रमुख अली फदावी यांनी ही माहिती दिली.

जुलैमध्ये तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात हानियाचा मृत्यू झाला होता. यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. फदावी म्हणाले, सर्वोच्च नेत्यांनी योग्य वेळ पाहून कारवाई करण्यास सांगितले आहे.

इस्रायलने शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण लेबनॉनमध्ये एका कारवर हवाई हल्ला केला. पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासचा सुरक्षा अधिकारी समर अल-हज या हल्ल्यात ठार झाला आहे.

Esakal
Hindenburg Post: कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.