इस्त्रायलने पाठवलेले ३ टन ऑक्सिजन उपकरणे आणि वैद्यकीय साहित्य भारतात दाखल झाले आहे. अधिकाधिक खासगी इस्त्रायली कंपन्यांनी यासाठी हातभार लावला आहे.
नवी दिल्ली : इस्त्रायल (Israel) आणि पॅलेस्टाइनमध्ये (Palestine) खडाजंगी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीतही इस्त्रायल आपल्या मित्र देशांना विसरलेलं नाही. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असताना जगभरातून मदत पाठविण्यात येत आहे. पॅलेस्टाइनशी संघर्ष सुरू असतानाही इस्त्रायलने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. (Israel Sends 3 tons of oxygen device to India battling COVID-19 in midst of conflict with Palestine)
इस्त्रायलने पाठवलेले ३ टन ऑक्सिजन उपकरणे आणि वैद्यकीय साहित्य भारतात दाखल झाले आहे. अधिकाधिक खासगी इस्त्रायली कंपन्यांनी यासाठी हातभार लावला आहे. भारतातील इस्त्रायलचे राजदूत डॉ. रॉन मालका यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. याआधीही इस्त्रायलकडून वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्त्रायलचा खरा मित्र असा उल्लेख केला होता. आणि त्यांचे आभारही मानले होते.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जगभरातून भारताला मदत पाठविण्यात येत आहे. ऑक्सिजन उत्पादक संयंत्र, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कन्सट्रेटर तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाठविण्यात येत आहेत. २७ एप्रिल ते १७ मे या कालावधीत १९ ऑक्सिजन उत्पादक संयंत्र, ११,३२५ ऑक्सिजन कन्सट्रेटर, १५,८०१ ऑक्सिजन सिलेंडर आणि ६.१ लाख रेमडेसिव्हिरची इंजेक्शन विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता.१८) दिवसभरात ४५२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दिवसात इतक्या जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आतापर्यंत २ लाख ८३ हजार २४८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी २ लाख ६७ हजार ३३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० वर पोचली आहे.
जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.