इस्ररायलच्या (Israel) तळसुद्रात नऊशे वर्ष जुनी तलवार सापडली आहे. श्लोमी काटजिन (Sholmi Katjin) या समुद्र संशोधकाने याचा शोध लावला आहे. ही तलवार एेतिहासक धर्मयुध्दात (Crusades) वापरण्यात आल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. धर्मयुध्दात (इंग्रजीत याला 'होली वार' असे म्हणतात.) लढाई दरम्यान एका सैनिकाची ही तलवार असण्याची शक्यता आहे. असे पुरात्तत्व विभागाने सांगितले आहे. कशी सापडली तलवार जाणून घेऊया..
अशी सापडली तलवार
अटलिटचे रहिवासी समुद्र संशोधक श्लोमी काटजिन हे संशोधन करत होते. २०० मिटर समुद्र खोलीत गेल्यानंतर त्यांना ही तलवार दृष्टीस पडली. त्यांनी जवळ जावून पाहिले तर ही खूप जुनी एेतिहासिक तलवार असण्याची त्यांची खात्री पटली. या तलवारीवर खूप जुने संदर्भ लिहल्याचे दिसत होते. यावेळी त्यांनी याचा व्हिडिओ केला. काटजिन यांनी ही तलवार पुरातत्व विभागाच्या स्वाधिन केली.अशी माहिती मिरर यूकेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आली आहे.
एेतिहासिक तलवार
या तलवारीत एक मीटर लांब ब्लेड आहे. याचे हॅंडल ३० सेमी चे आहे. ही तलवार क्रुसेडर नाईटची होती. हा एक सुंदर आणि एेतिहासिक शोध असल्याची माहिती रॅाबरी प्रिवेंशन यूनिट इंस्पेक्टर निर डिस्टेलफेल्ड यांनी सांगितली आहे.
तलवार योध्याची
पुरातत्व विभागाने सांगितले आहे की, ही तलवार धर्मयुध्दच्या दरम्यान लढणाऱ्या सैनिकाची आहे. त्याकाळी अशा सैनिकांना क्रुसेडर म्हटले जात होते. ही तलवार स्वच्छ करून एेतिहासिक वस्तू जतन करण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.