Israel war on Gaza: गाझात २४ तासांत १५० जणांचा मृत्यू; गाझाच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती

Israel war on Gaza: इस्राईलच्या सैन्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या उत्तरेमध्ये इस्राईलच्या सैन्य दलाने केलेल्या कारवाईमध्ये हमासच्या १५ दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे.
Israel war on Gaza
Israel war on Gaza
Updated on

Israel war on Gaza:

जेरुसलेम: इस्राईल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये मागील २४ तासांमध्ये १५० नागरिकांचा मृत्यू झाला असून ३१३ नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती बुधवारी गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, इस्राईलच्या सैन्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या उत्तरेमध्ये इस्राईलच्या सैन्य दलाने केलेल्या कारवाईमध्ये हमासच्या १५ दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे येथील शाळेच्या इमारतीमध्ये निर्माण केलेल्या दहशतवादी तळ उद्‍ध्वस्त केले आहे.

हमासच्या ताब्यात असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत गाझा पट्टीतील २६ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सामान्य नागरिक किती आहेत याची आकडेवारी यात देण्यात आलेली नाही.

Israel war on Gaza
Pakistan Terrorists: 'भारत आमच्या घरात घुसून दहशतवाद्यांना मारतोय'; पाकिस्तानचं रडगाणं.. चीननेही मिसळला सुरात सूर

अपहृतांच्या नातेवाइकांना चिंता-

हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाइकांनी अपहृतांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अपहृतांच्या सुरक्षिततेपेक्षा राजकीय नेतृत्वाला त्यांची राजकीय धोरणे महत्त्वाची वाटत असल्याची भीती एका अपहृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अपहृतांची सुटका करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे आणि त्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे इस्राईलच्या सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Israel war on Gaza
Zuckerberg Apology : 'तुमचे हात रक्ताने माखलेत..', सिनेटरच्या आरोपांनंतर मार्क झुकरबर्गने मागितली पालकांची माफी! म्हणाला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.