Israel–Hamas war : गाझापट्टीला सहकार्य करण्याबाबतचा ठराव 'यूएन'मध्ये मंजूर; शस्त्रसंधीबाबत निर्णय नाहीच

गाझापट्टीला मानवतावादी भूमिकेतून साहाय्य करण्याबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला.
Israel Hamas War
Israel Hamas WarEsakal
Updated on

न्यूयॉर्क : गाझापट्टीला मानवतावादी भूमिकेतून साहाय्य करण्याबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला. परंतु, तेथील शस्त्रसंधीबाबत काही ठराव करण्यात आला नाही. या संदर्भात बरीच चर्चा झाली होती. तसेच, मतदान घेण्यासाठी विलंब झाल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.

गाझापट्टीला मदत करणे, ही सध्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केले. संयुक्त अरब अमिरातीने तयार केलेल्या ठरावावर १५ देशांपैकी १३ देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर अमेरिका आणि रशिया हे देश तटस्थ राहिले.

७ ऑक्टोबरपासून आजतागायत गाझात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २० हजारांवर गेली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली असून त्यात २० हजार ५७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

Israel Hamas War
Judge Recruitment : न्यायाधीशांच्या भरतीबाबत पाच जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

गाझात राहणाऱ्या नागरिकांचे नातेवाईक कॅनडात असतील तर त्यांना तात्पुरता व्हिसा देण्याची घोषणा शुक्रवारी कॅनडा सरकारने केली. देशाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी म्हटले, येत्या 9 जानेवारीपासून व्हिसा जारी करण्याची मोहीम सुरू होऊ शकते.

Israel Hamas War
LokSabha Election: विजयासाठी ‘पंचसूत्र’, महाराष्ट्रातील तीन मतदार संघावर विशेष लक्ष; भाजपचं लोकसभेसाठी कसं आहे नियोजन?

उत्तर गाझामधील अनेक रुग्णालयांवर हल्ले करून त्यांना ‘जर्जर’ करणाऱ्या इस्राईलने गाझात कार्यरत असलेल्या अखेरच्या रुग्णालयावरही छापे घातले. सैनिकांनी रुग्णालयाच्या भिंती बाँबने पाडून प्रवेशद्वारही तोडले. इस्राईलच्या सैनिकांनी रुग्णालयातील बहुतेक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.