'ब्रो... ब्रो... ते पडत आहे!'; इस्राईलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सांगितली हवाई हल्ल्याची भीषणता, थरारक Video पाहा

Lives of Indian Students and Workers in Tel Aviv at Risk Amid Escalating Conflict : भारतीय दूतावासाने इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सावध राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, अनेक विद्यार्थी आणि कामगारांना तातडीने भारतात परतण्याची गरज भासत आहे.
Missile strikes near residential areas in Tel Aviv, as Indian citizens share their experiences of living in constant fear during the Israel-Iran conflict.
Missile strikes near residential areas in Tel Aviv, as Indian citizens share their experiences of living in constant fear during the Israel-Iran conflict.esakal
Updated on

इस्राईलमध्ये सध्या सुरू असलेल्या इस्रायल-इराण संघर्षामुळे तेथील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोलकाता जवळील मध्यमग्राम येथील नीलब्जा रॉयचौधरी, जे तेल अविवमधील बार-ईलान विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकत आहेत, त्यांनी सांगितले की, "दररोज परिस्थिती अधिकच भयानक होत आहे." तेलंगणा येथील राजेश मेडिचर्ला, जे तेल अविवमध्ये केअरगिव्हर म्हणून काम करतात, त्यांनी सांगितले की, "आम्ही इतकी गंभीर परिस्थिती कधीच पाहिली नाही."

मिसाईल हल्ल्यांमुळे भारतीय नागरिक धास्तावले

मेडिचर्ला यांनी तेल अविवमध्ये एका इमारतीवर पडणाऱ्या मिसाईलचा व्हिडिओ शेअर केला आणि तेलुगु भाषेत सांगितले, "ब्रो... ब्रो... ते पडत आहे!" त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, "मिसाईल इतक्या दूरवर म्हणजे तेल अविवपर्यंत पोहोचेल, याची आपण कल्पनाही केली नव्हती." इस्राईलमधील भारतीय विद्यार्थी आणि कामगार या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड धास्तावले आहेत.

उद्ध्वस्त शहरं आणि परतण्याची चिंता

उत्तर इस्राईलमधील स्फेड आणि हाइफा सारखी शहरं या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत. स्फेडमध्ये राहणारे रॉयचौधरी यांनी सांगितले की, "काही दिवसांपूर्वीच एका मित्राच्या घराजवळील १०० मीटर अंतरावर एक बॉम्ब पडला होता. ती घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्या बॉम्बचा फटका मित्राच्या घरालाही बसला असता." भारतीय विद्यार्थ्यांना या परिस्थितीत परतण्याची इच्छा असूनही आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत.

Missile strikes near residential areas in Tel Aviv, as Indian citizens share their experiences of living in constant fear during the Israel-Iran conflict.
Iran Israel War Video: इस्रायलमध्ये हाहाकार इराणने डागली 100 हून अधिक क्षेपणास्त्रे; पाहा थरारक व्हिडिओ

मदतीची अपेक्षा

भारतीय दूतावासाने इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सावध राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, अनेक विद्यार्थी आणि कामगारांना तातडीने भारतात परतण्याची गरज भासत आहे.

Missile strikes near residential areas in Tel Aviv, as Indian citizens share their experiences of living in constant fear during the Israel-Iran conflict.
Israel-Iran War: 'दोनशे क्षेपणास्त्र डागले पण हल्ला अपयशी', इस्राईलवरील हल्ल्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; बायडेन म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.