Israel-Hamas War: इस्राइलने कॉपी केला आर्मीचा काश्मीर फॉर्म्युला.. आंदोलन करणाऱ्याला जीपला बांधून फिरवलं अन्...

Israel-Hamas War: जीपला बांधलेल्या व्यक्तीचे नाव मुजाहिद आझमी असे असून तो जेनिनचा पॅलेस्टिनी रहिवासी आहे, अशी टीका झाल्यानंतर इस्रायली सैन्याने आपल्या सैनिकांनी चूक केल्याचे मान्य केले आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas Waresakal
Updated on

गाझामध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या इस्रायली लष्कराने शनिवारी एकाला जीपसमोर बांधून त्याची परेड काढली. ही घटना शनिवारी घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्रायली सैनिकांनी जेनिनच्या व्याप्त वेस्ट बँक शहरात छापे मारताना जखमी पॅलेस्टिनी माणसाला लष्करी वाहनाला बांधले, असे लष्कराने रविवारी सांगितले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हा संशयित जखमी झाला. लष्कराने सांगितले की, ते पश्चिम किनाऱ्याच्या वाडी बुर्किन भागात काही वॉन्टेड दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेले होते.

जीपला बांधलेल्या व्यक्तीचे नाव मुजाहिद आझमी असे असून तो जेनिनचा पॅलेस्टिनी रहिवासी आहे, अशी टीका झाल्यानंतर इस्रायली सैन्याने आपल्या सैनिकांनी चूक केल्याचे मान्य केले आहे.

Israel-Hamas War
Hajj Pilgrim: हज यात्रेदरम्यान 1,301 जणांचा गेला जीव; सौदी अरेबियाने सांगितलं मृत्यू मागील खरं कारण...

लष्कराने दिले चौकशीचे आदेश

इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना लष्कराच्या मूल्यांनुसार नाही, या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. जखमी व्यक्तीला पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

जेनिन हा फार पूर्वीपासून पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आहे. इस्रायली सैन्याने शहर आणि जवळच्या निर्वासित छावणीवर नियमितपणे हल्ले केले. शनिवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आले होते, त्यादरम्यान संशयित व्यक्ती जखमी झाला तेव्हा लष्कराने त्याला पकडले. त्याला जीपच्या बोनेटला बांधून मानवी ढाल म्हणून वापरल्यानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रेड क्रेसेंटच्या ताब्यात देण्यात आले.

Israel-Hamas War
Russia church Attack: रशिया हादरलं! चर्चच्या फादरचा गळा कापला, 15 पोलिसांचा गोळीबारात मृत्यू, 5 हल्लेखोरांचा खात्मा

भारतीय लष्करानेही दगडफेक करणाऱ्याला बांधले होते गाडीला

एप्रिल 2017 मध्ये भारतातही असाच प्रकार घडला होता. भारतीय लष्कराने एका स्थानिक तरुणाला जीपच्या बोनेटला बांधून काश्मीरमध्ये फिरवले होते. दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी लष्कराने हे केले होते. 26 वर्षीय फारुख अहमद दार हे पेशाने टेलर होते आणि बडगामचे रहिवासी होते. राष्ट्रीय रायफल्सच्या एका मेजरने असे कृत्य केले होते.

Israel-Hamas War
Israel-Hamas war : इस्राईलच्या उत्तर सीमेवरही युद्धाचे ढग;संघर्ष वाढल्यास हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.