इस्रायलमध्ये राजकीय संकट अधिक गडद होत चाललंय.
इस्रायलमध्ये राजकीय संकट (Israel Political Crisis) अधिक गडद होत चाललंय. यामुळंच संसद बरखास्त करण्यात आलीय. चार वर्षांत पाचव्यांदा 1 नोव्हेंबर रोजी देशात फेरनिवडणुका होणार आहेत. या काळात यायर लॅपिड (Yair Lapid) हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर देशाचे कार्यवाहक पंतप्रधान बनतील.
इस्रायलचे सर्वात कमी कालावधीचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naphtali Bennett) यांच्यानंतर ते हे पद भूषवणारे 14 वे व्यक्ती असतील. गेल्या अनेक दिवसांपासून देशात संसद बरखास्त होण्याची शक्यता होती. त्यामुळं पुन्हा एकदा बेंजामिन नेतन्याहू पुनरागमन करू शकतात, असं बोललं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना आपला मित्र मानलंय. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली, तेव्हा पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर हिब्रू आणि इंग्रजी भाषेत त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी लिहिलं की, 'इस्रायलमध्ये पाचव्यांदा सरकार स्थापन केल्याबद्दल माझे मित्र नेतन्याहू यांचं अभिनंदन.'
अगदी अलीकडं इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. पंतप्रधान असताना बेनेट यांनी शेवटच्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याचं मानलं जात होतं. बेनेट यांच्या निर्णयामुळं एक महत्त्वाकांक्षी राजकीय योजना देखील संपुष्टात आली, जिथं आठ विरोधी विचारधारावादी पक्ष त्यांचं मतभेद बाजूला ठेवून केवळ माजी नेते बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी एकत्र आले. नेतान्याहू सध्या विरोधी पक्षनेते आहेत. दरम्यान, बेनेट हे आठ पक्षांचं युतीचं सरकार चालवत होते आणि गेल्या दोन महिन्यांत अनेक सदस्यांनी साथ सोडल्यानं संसदेत सरकार अल्पमतात आलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.