इस्रायल उभारतंय 'लेझर' भिंत! शत्रूच्या रॉकेट, मिसाईल, ड्रोनची होईल राख

शत्रूच्या रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांपासून 'लेझरच्या भिंती' (Laser wall) देशाचे संरक्षण करतील, असं इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी म्हटले आहे.
Naftali Bennett
Naftali BennettEsakal
Updated on

हमासच्या (Hamas) सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) म्हटले आहे की, रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि यूएव्ही यांपासून 'लेझरच्या भिंती' (Laser wall) देशाचे संरक्षण करतील. अतिरेकी गटांकडून इस्रायलवर (Israel) वारंवार होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांचा उल्लेख करताना बेनेट म्हणाले की, "आर्थिक समीकरणं उलट होतील, ते खूप गुंतवणूक करतील आणि आम्ही थोडी गुंतवणूक करू." इस्रायली पंतप्रधानांनी इराणकडेही लक्ष वेधले, जर काही डॉलर्स खर्च करून इलेक्ट्रिक पल्सच्या सहाय्याने क्षेपणास्त्र किंवा रॉकेट रोखणे शक्य असेल, तर इराणने आमच्या सीमेवर लावलेली आग आम्ही नष्ट करू. (Israel's PM Naftali Bennett said a 'Laser Wall' will protect the country from rockets, missiles and UAVs.)

हवाई संरक्षणाची ही नवीन पिढी प्रदेशातील मित्रांना देखील सेवा देऊ शकते. गेल्या वर्षी मे महिन्यात हमासने डागलेल्या हजारो रॉकेटचा हवाला देताना बेनेट यांनी सांगितले की, अतिरेक्यांनी डागलेल्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी इस्रायलची आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सैन्याने मोठ्या प्रमाणात वापरली आहे. परंतु ती महाग आहे.

लष्करी तज्ज्ञांच्या मते ही लेझर सुरक्षा कदाचित वर्षानुवर्षे तयार होणार नाही, परंतु बेनेट यांनी ही प्रणाली एका वर्षात सादर केली जाईल.इस्रायलच्या आयर्न डोम शील्डमध्ये ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट एकाच वेळी रोखण्याची क्षमता आहे आणि इस्रायलला त्यांच्या शेजाऱ्यांवर लष्करी वर्चस्व राखण्यासाठी मदत करण्याचे श्रेय या प्रणाली दिले जाते.

आयर्न डोम (Iron Dome) क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली :

2007 मध्ये इस्त्रायलची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली म्हणून आयर्न डोमची औपचारिकपणे निवड करण्यात आली होती, त्याच वर्षी इस्लामी गट हमासने गाझा पट्टीचा ताबा घेतला होता. ही प्रणाली 4 ते 70 किलोमीटर पल्ल्यातून सोडलेल्या रॉकेट आणि तोफखान्यांना रोखण्यासाठी डिझाइन केली होती. इस्रायली हवाई दल 2011 पासून गाझामधून होणारे रॉकेट हल्ले उधळून लावत आहे. एका अहवालानुसार आयर्न डोमच्या प्रत्येक बॅटरीची किंमत अंदाजे $100 दशलक्ष आहे आणि क्षेपणास्त्रांची किंमत 50,000 अमेरिकी डॉलर एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.