आता फक्त 100 रुपयांत करा घर खरेदी; पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण

Italian Government
Italian Governmentesakal
Updated on
Summary

जर तुम्हाला समजलं, की फक्त 100 रुपयांमध्ये घर मिळत आहे, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का?

जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं घर असावं, असं वाटत असतं. पण, सध्याच्या महागाईच्या युगात घर खरेदी करणं किंवा बांधणं हे फार कठीण काम आहे. मध्यमवर्गीय माणसाची आजीवन कमाई घर खरेदीकडे जाते. हे सर्व असूनही स्वतःचं घर असणं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, तुम्हाला एवढं स्वस्त घर मिळत आहे, त्याबद्दल जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

Italian Government
अमेरिकेत चांगला पगार, बोनस असूनही 43 लाख लोकांनी सोडली नोकरी

जर तुम्हाला समजलं, की फक्त 100 रुपयांमध्ये घर मिळत आहे, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना! पण, हे पूर्णपणे सत्य आहे. परंतु, एवढं स्वस्त घर भारतात उपलब्ध नाही. हे घर अब्रुझो राज्यातील प्रटोला पेलिग्ना (Pratola Peligna) नावाच्या ठिकाणी आहे. येथे लोकांना राहण्यासाठी फक्त 100 रुपयांत घर मिळत आहे. इथल्या सरकारनं एक योजना सुरू केलीय, ज्या अंतर्गत लोकांना स्वस्त घरं दिली जाताहेत.

Italian Government
पठ्ठ्याचा नादच खुळा! पिकवला 1 हजार किलोचा एकच भोपळा

सरकारची ही योजना काही दिवसांपूर्वीच प्रटोला पेलिग्ना येथे सुरू करण्यात आली. ज्या लोकांना घरांची गरज आहे, त्यांच्याकडून अर्ज मागवले जात आहेत. सरकारला इथं 250 घरं विकायची आहेत. परंतु, खरेदीदाराला त्याची दुरुस्ती करावी लागेल, ज्यासाठी बरेच पैसे खर्चही होऊ शकतात. तुम्ही हे घर शंभर रुपयांना खरेदी करू शकता, पण ते दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे पैसे असायला हवेत. प्रटोला पेलिग्ना प्राधिकरणाच्या मते, जर सहा महिन्यांत घराची दुरुस्ती झाली नाही, तर घराच्या मालकाला सुमारे 9 लाख रुपये दंड भरावा लागेल.

Italian Government
अवघं एक वर्षाचं बाळ, महिन्याला कमावतंय ७५ हजार रुपये; पाहा Photo

स्की रिसॉर्ट (Ski resort) लगतचं ही घर बांधण्यात आलीयत. याशिवाय, येथून रोम देखील काही अंतरावरचं आहे. यापूर्वीही, अनेक वेळा एक युरोसाठी घर विकण्याची योजना इटालियन अधिकाऱ्यांनी आणली होती. या घरांचा लिलाव करुन एक युरोपासून या घरांची खरेदी सुरू होईल. घराच्या मालकांना ते तीन वर्षांत राहण्यायोग्य बनवावं लागेल. मात्र, जर कोणी इटलीबाहेर राहत असेल आणि त्यांना घर खरेदी करायचं असेल, तर 2 लाख 62 हजार रुपये शुल्क भरावे लागेल. याआधीही इथल्या सरकारनं आणखी अनेक शहरांमध्ये स्वस्त घरांची योजना लागू केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()