Global News: ऐतिहासिक वास्तूंवर प्रेयसीचं नाव कोरलं; आपल्याकडे सामान्य वाटणाऱ्या गोष्टीबद्दल इटलीत काय घडलं?

ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर जाऊन तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवर आपली नावं कोरणं आणि विध्वंस करणं हे भारताला नवीन नाही. पण हेच केल्याने इटलीत काय घडलं ते नक्की वाचा....
Italy Man Viral Video
Italy Man Viral VideoSakal
Updated on

ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर जाऊन तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवर आपली नावं कोरणं आणि विध्वंस करणं हे भारताला नवीन नाही. बहुतांश ऐतिहासिक ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं विद्रुपीकरण झालेलं दिसेल.

याबद्दल सरकारकडून तसंच विविध संघटनांकडून सातत्याने आवाहन केलं जातं, प्रसंगी कान टोचले जातात. क्वचित कारवाईही केली जाते. पण इटलीमध्ये जे घडलं, त्याचा आदर्श आपण घ्यावा, असंच आहे.

इटलीमध्ये एका पर्यटकाने आपलं आणि आपल्या प्रेयसीचं नाव रोममधल्या एका प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर कोरलं. हा प्रताप करत असताना त्याने एक व्हिडीओही केला. यावरुन मोठा हंगामा झाल्यावर आता या गोष्टीची दखल प्रत्यक्ष इटलीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्र्यांनी घेतली आहे. (global News)

Italy Man Viral Video
Global News : तुटलेल्या गिटारची किंमत ५ कोटी रुपये; एका माणसाने विकतही घेतली!

"इव्हान + हेली 23" असा मजकूर या पर्यटकाने भिंतीवर कोरला होता. ऑरेंज, कॅलिफोर्निया येथील रायन लुट्झ या सहकारी पर्यटकाने या घटनेचं शूटिंग केलं आणि YouTube आणि Reddit वर व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडीओ दीड हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. इटालियन मीडियानेही तो उचलून धरला. आणि अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारकाची विटंबना झाल्याबद्दल निषेधही व्यक्त केला.

Italy Man Viral Video
Global News : करायला गेली एक अन्...; महिलेची जीभच काळी पडली, केसही उगवले! काय आहे हा आजार?

हे फ्लेव्हियन अॅम्पिथिएटर जवळपास २००० वर्षे जुनं आहे. त्यामुळे अशा प्रकारे ऐतिहासिक वास्तूची विटंबना करणाऱ्या पर्यटकाला आपण शोधून काढू आणि त्याला कठोर शासन केलं जाईल, असं सांस्कृतिक मंत्री गेनारो संगियुलियानो यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक वास्तूंवर नावं कोरण्याची ही या वर्षातली चौथी घटना आहे. अशा घटना रोखण्यासाठी अशा प्रकारे विटंबना करणाऱ्या व्यक्तीला १५ हजार डॉलर्सचा दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 पर्यटन मंत्री डॅनिएला सांतान्चे म्हणाले की अशा प्रकारे इटलीच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अनादर करणाऱ्या पर्यटकाला आम्ही लवकरच शोधू आणि या लोकांना अशा प्रकारे मोकाटपणे वागू देणार नाही, त्याला कठोर शिक्षा केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.